Bigg Boss 20 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस सिझन 20 मध्ये पहिल्याच आठवड्यापासून ड्रामा, वाद आणि मनोरंजन पाहायला मिळत आहे. नुकताच शोचा पहिला ‘विकेंड का वार’ पार पडला. यावेळी होस्ट सलमान खानने काही स्पर्धकांना फटकारलं, तर काहींचं कौतुकही केलं. पहिल्या आठवड्यात लव्ह गिल, अरिश्फा खान, उदिती सिंह आणि कनिका मान हे चार स्पर्धक नॉमिनेट झाले होते. यामध्ये उदिती सिंहला सर्वात कमी मते मिळाल्याची माहिती समोर आली. मात्र, तिला मिळालेल्या अतिरिक्त जीवनदानामुळे ती एलिमिनेशनपासून वाचली.
मुंबई : ‘किरण गायकवाड’ म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो ‘देवमाणूस’ मालिकेतील खतरनाक व्हिलन. मालिकेतील त्याच्या प्रभावी आणि क्रूर ...
दुसऱ्या आठवड्यात कोणते स्पर्धक नॉमिनेट ?
पहिल्या आठवड्याचा निकाल समोर आल्यानंतर आता दुसऱ्या आठवड्यातील नॉमिनेशनही पार पडलं आहे. बीबी तकच्या रिपोर्टनुसार, आसिफ खान, रोहेद खान आणि तन्मय सिंह म्हणजेच स्काऊट या तीन स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नॉमिनेशन टास्कदरम्यान हे तिन्ही स्पर्धक नॉमिनेशनसंदर्भात चर्चा करत होते. ही बाब बिग बॉसच्या लक्षात आल्यानंतर संपूर्ण नॉमिनेशन टास्क रद्द करण्यात आला. त्यामुळे या तिघांवर आता थेट बेघर होण्याची टांगती तलवार आहे. (Bigg Boss 20)
Samantha Ruth Prabhu Baby Shower : सुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) लवकरच आई होणार आहे. ती आणि तिचे पती सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरू (Raj Nidimoru) ...
कॅप्टन यंग डीसीएला मिळाला बचाव
या नॉमिनेशन चर्चेत घराचा कॅप्टन यंग डीसीए देखील सहभागी होता, अशी माहिती आहे. मात्र, तो घराचा कॅप्टन असल्यामुळे त्याला नॉमिनेशनपासून वाचवण्यात आलं. आता आसिफ खान, रोहेद खान आणि स्काऊट यांच्यापैकी कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. यापैकी कोणाचं ‘बिग बॉस’मधील जीवनदान संपणार, हे आगामी भागात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात आणखी कोणता ट्विस्ट पाहायला मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.




