मुंबई: मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा कमालीचा फटका बसणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवाती पासूनच मुंबई, उपनगरातील नागरिकांना उन्हाचे चटके बसत आहेत. आता मुंबईकरांना उन्हापासून स्वत:ची निगा राखण्यासाठी टोपी आणि छत्रीचा वापर करावा लागणार आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी रेकॉर्ड ब्रेक तापमान मुंबई आणि शहरामध्ये पाहायला मिळणार आहे. 3 ऑक्टोबरला मुंबई आणि शहरामध्ये 35 सेल्सिअसतच्या पुढेच वातावरण असणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दुपारच्या वेळी काही काम असेल तरच घराच्या बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबई : 30 सप्टेंबर रोजी MPSC विद्यार्थी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मागण्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत ...
मुंबईकरांनो पुढील 48 तासांमध्ये नागरिकांना उष्णतेचा फटका बसण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबई महानगर क्षेत्रांतर्गत भागातील तापमान 36°C- 37°C पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आर्द्रतेमुळे 39°C- 40°C इतके असह्य तापमान जाणवण्याची शक्यता आहे. आजपासूनच मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना उष्णतेची आद्रता मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता आहे. पुढच्या 48 तासांसाठी हा हवामान विभागाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच आपली काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
मिठी नदीतील गाळ उपसा आणि सफाईच्या कामातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अभिनेता डिनो मोरिया याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) ...
सध्या राज्यामध्ये, परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. परतीच्या पावसामुळे नागरिकांना सध्या तरी दिलासा मिळणार नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा देखील मिळाला होता. पण आता पुन्हा एकदा मुंबईकरांना उष्णतेच्या झळा बसणार आहे. अनेक हवामान तज्ज्ञांनी ऑक्टोबर महिन्यापासून 'एल निनो'स्थितीची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली होती. त्याच दृष्टीने आता नागरिकांना वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. परतीच्या पावसामुळे काहीसा नागरिकांना दिलासा शक्यता असेल, पण दुपारच्या वेळी नागरिकांना उन्हाच्या उकाड्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.




