मुंबई: मुंबई- ठाणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कायमच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. विशेषत: नोकरदारांना या वाहतूक कोंडीचा फटका बसतो. मुंबई- ठाणे दरम्यानची होणारी ही दररोजची वाहतूक कोंडी कायमची फोडण्यासाठी एमएमआरडीएकडून 13.9 किमी लांबीचा 'ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशन' (उन्नत मार्ग) तयार केला जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA)च्या मार्फत हा ब्रिज तयार केला जात आहे. या उन्नत मार्गामध्ये, एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा पार पडला आहे. भांडूप पंपिंग स्टेशनजवळ पहिला 90 टनांचा महाकाय सेगमेंट (प्रीकास्ट ब्लॉग) यशस्वीपणे उभारण्यात आला आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘वायू प्रदूषण नियंत्रण व अंमलबजावणी कृती आराखडा-२०२६’ तयार केला आहे. या अंतर्गत ३ ...
महाकाय सेगमेंट यशस्वीपणे उभारण्यात आल्यानंतर 'ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशन'चा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. महत्त्वाचे म्हणजे, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर खालून वाहनांची ये- जा सुरू असतानाच एमएमआरडीएकडून काम केलं जात होतं. कोणताही विशेष ब्लॉक न घेता पुलाचे काम करण्यात आले. पुलाची उभारणी करण्यासाठी 'लाँचिंग गॅन्ट्री' या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यामुळे खाली वाहनांची ये- जा सुरू असताना आणि वाहनांना वाहतूकीवेळी कोणताही अडथळा न येता हवेतच महाकाय गर्डर सुरक्षितपणे बसवण्याचं काम एमएमआरडीएकडून करण्यात आलं आहे. या सहा पदरी उन्नत मार्गामुळे वाहतूकदारांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.
Major Milestone for Mumbai: MMRDA Erects First Span of Elevated Eastern Freeway Over Live Traffic
A major engineering milestone was achieved on Monday on Mumbai’s 13.9-km, six-lane Elevated Eastern Freeway Extension (EFE), with the erection of precast segments commencing over the busy Eastern Express Highway while traffic continued to move below. The first segment, weighing over 90 tonnes, was launched at Pier P78 near Bhandup Pumping Station, using a massive 115-metre-long mechanised Launching Gantry-01 (LG-01). This marks the transition from foundation and substructure works to the erection of the elevated corridor’s superstructure. The mechanised gantry enables heavy precast segments to be lifted, positioned and erected with minimal ground-level support and limited interference with traffic. The gantry had also completed third-party testing ahead of the launch. What happens next? LG-01 will progressively erect 1,632 precast segments towards Mumbai, which will be longitudinally post-tensioned to form complete bridge spans. A second gantry (LG-02) will advance from Vikhroli towards Mumbai, while the Ground Support System (GSS) will progress between Bhandup and Kanjurmarg towards Thane. The Scale 106 tonnes | Maximum segment weight 1,450 tonnes | Maximum span weight 40 m | Typical span 16 | Segments per span 288 | Total full spans 25 m / 7 m | Top / bottom width Project progress: 81% monopiles | 19% group piles | 51% piers | 33% pier caps | 135 of 3,732 precast segments cast The EFE combines 2,500-mm-diameter monopiles, a single-pier arrangement that eliminates conventional pile caps and advanced mechanised launching technology, minimising the construction footprint while allowing work to progress above a live traffic corridor. The project connects Anand Nagar in Thane with Chheda Nagar in Ghatkopar. It is designed to create a faster, more reliable route while easing congestion on the Eastern Express Highway, one of Mumbai’s busiest transport corridors. Once complete, the corridor is expected to bring South Mumbai–Thane travel time down to just 20–25 minutes, while easing congestion on the Eastern Express Highway and enhancing regional connectivity. Mumbai’s next major high-speed corridor is taking shape above one of its busiest traffic arteries, without stopping the movement below. #MMRDA #EasternFreewayExtension #MumbaiInfrastructure #MumbaiInMinutes #InfrastructureDevelopment #Mumbai #Thane #ReshapingMMR @PMOIndia @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @MahaDGIPR @MMRDAOfficial @MMMOCL_Official @PIB_India — MMRDA (@MMRDAOfficial) September 28, 2026
13.9 किमीचा ईस्टर्न फ्रीवे हा ठाण्यातील आनंद नगर ते घाटकोपरमधील छेडा नगर दरम्यान बांधण्यात येणार आहे. या मार्गासाठी एमएमआरडीएला तब्बल 2682 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. या उन्नत मार्गासाठी एमएमआरडीएकडून 40 मीटरचे एकूण 288 स्पॅन उभारले जाणार आहे. तर, संपूर्ण प्रोजेक्टसाठी 3732 प्रीकास्ट सेगमेंटचा वापर केला जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने या मार्गावर मुलुंड, ऐरोली, जेव्हीएलआर (JVLR), कांजूरमार्ग, विक्रोळी आणि घाटकोपर या प्रमुख ठिकाणांना जोडणारे रॅम्प आणि लूप तयार करण्यात येणार आहे, असा हा संपूर्ण ब्रिज उभारला जाणार आहे. ह्या उन्नत मार्गामुळे ठाणे- मुंबईकरांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.
- १८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमभंग झाल्यास कारवाई; अमराठी चालकांना परिवहनमंत्री सरनाईकांचा इशारा मुंबई : व्यवहारिक मराठीच्या कायद्याच्या अंमलबजावणीला ...
दरम्यान, सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी नोकरदारांना ठाण्यावरून दक्षिण मुंबईच्या दिशेने आणि दक्षिण मुंबईवरून ठाण्याला प्रवास करताना वाहनांच्या रांगेमध्ये तासनतास अडखळत राहावं लागतं. यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधनाची आणि वेळेचे मोठे नुकसान होते. हेच होणारे नुकसान लक्षात घेत, सरकारने नोकरदारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रोजेक्टची आखणी केली. या उन्नत मार्गामुळे दक्षिण मुंबई ते ठाण्यादरम्यानचा दररोजचा 20 ते 25 मिनिटांचा प्रवास कमी होणार आहे. सध्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. किती दिवसांमध्ये हा पूल नोकरदारांच्या सेवेमध्ये दाखल होईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.




