- जागतिक 'ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६' चे करणार उद्घाटन
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या 'ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६'चे उद्घाटन होणार आहे. या जागतिक वित्तीय तंत्रज्ञान महोत्सवात ते उपस्थितांना विशेष मार्गदर्शनही करणार आहेत. सायंकाळी ५:४५ वाजता ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आणि विमानतळ परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. (PM Narendra Modi)
मुंबईत ८ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सातव्या 'ग्लोबल फिनटेक फेस्ट'चे आयोजन करण्यात आले आहे. वर्ष २०२० पासून सुरू झालेली ही परिषद आता एक अग्रगण्य आंतरराष्ट्रीय विचार-नेतृत्व व्यासपीठ म्हणून उदयास आली आहे. वित्त क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी धोरणकर्ते, नियामक मंडळे, मध्यवर्ती बँकांचे प्रतिनिधी, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज, जागतिक गुंतवणूकदार आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना हे व्यासपीठ एकत्र आणते.(PM Narendra Modi)
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी अमेरिकेतील ‘न्यू ...
'एजेंटिक एआय, टोकेनायझेशन, क्वांटम' ही यंदाच्या आयोजनाची मुख्य संकल्पना असणार आहे. डिजिटल पेमेंट आणि आर्थिक समावेशनामध्ये भारताचे जागतिक नेतृत्व अधिक दृढ करणे, हा यामागील प्रमुख उद्देश आहे. या परिषदेत धोरण, नियमन, तंत्रज्ञान, भांडवल आणि उद्योग या सर्व घटकांना एकाच व्यासपीठावर आणले जाणार असून एजेंटिक एआय, प्रोग्रामेबल फायनान्स आणि क्वांटम तंत्रज्ञान यांसारख्या उदयोन्मुख विषयांवर सखोल चर्चा सत्रे पार पडतील.
- मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय; ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती, मृतांच्या वारसांना सरकारी नोकरीचा मार्ग मोकळा मुंबई : मनोज ...
दरम्यान, मुंबईच्या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदी दुपारी १२ वाजता वडोदरा येथे सुमारे ३५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करणार आहेत. वडोदरा येथील कार्यक्रम आटोपून ते विशेष विमानाने मुंबईत दाखल होत फिनटेक फेस्टच्या उद्घाटनाला उपस्थित राहतील. (PM Narendra Modi)






