Friday, October 2, 2026

Captain Smit Machchhar: 174 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या वैमानिक स्मित माच्छर यांना अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी

Captain Smit Machchhar: 174 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या वैमानिक स्मित माच्छर यांना अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी

नवी दिल्ली: इस्त्राईल- तेल अवीवला घेऊन जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर हवेतच रक्तरंजित चाकुहल्ला करण्यात आला होता. चाकु हल्ल्यानंतर 174 प्रवाशांचा जीव सुखरूप पद्धतीने वाचवणाऱ्या स्मित यांना अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून वैमानिक स्मित मच्छार यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी केली जात आहे.

संकटकाळात कॅप्टन स्मित यांनी दाखवलेले शौर्य आणि प्रसंगावधान ओळखून, सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून भारत सरकारला त्यांना सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार, अशोक चक्र देऊन सन्मानित करण्याचे आवाहन केले आहे. अनेकांनी लिहिले आहे की, स्मित यांनी ज्या प्रकारे इतक्या प्रवाशांचे प्राण वाचवले, ते खरोखरच अविश्वसनीय आहे. शिवाय, त्यांनी कर्तव्यापलिकडे जाऊन प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. 'फ्लाय दुबई' कंपनीच्या विमानामध्ये, वैमानिक स्मित मच्छार त्यांच्या सहवैमानिकासोबत कॉकपिटमध्ये होते. विमानाच्या कॉकपिटमध्ये सहवैमानिकाने कॅप्टन मच्छार यांच्यावर चाकू हल्ला केला.

कॅप्टन मच्छार यांच्यावर चाकू हल्ला केल्यामुळे तब्बल 14,000 फूट खाली विमान कोसळले. पण स्मित यांनी सुरक्षित पद्धतीने विमान सौदी अरेबियाला उतरवले. जखमी कॅप्टन स्मित यांच्यावर युएईमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी फक्त भारतातूनच नाही तर, संपूर्ण जगभरातून प्रार्थना केली जात आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन मच्छार यांच्यासोबत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. कॅप्टन स्मित यांचे मुंबईतील घाटकोपरमध्ये राहतात. ते राहत असलेल्या घाटकोपर आणि टिळक नगर परिसरातील रहिवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिकांकडून सोशल मीडियावर आपल्या परिसरातील कॅप्टनचा अभिमान व्यक्त केला आहे.

इतकंच नाही तर, कॅप्टन स्मित यांना इस्त्राईल सरकारकडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे. असीम धैर्याचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर, कॅप्टन स्मितसह 4 इस्त्राइल प्रवाशांनाही 'प्रेसिडेंट मेडल'ने गौरविण्यात येणार आहे. कॉकपिटमध्ये वैमानिक आणि सहवैमानिक यांच्यामध्ये सुरू असलेल्या झटापटीदरम्यान, हल्लेखोर सहवैमानिकाला जमिनिवर लोळवणाऱ्या चार इस्त्रायली प्रवाशांच्या शौर्याची इस्त्राईल सरकारने दखल घेतली आहे. कॅप्टन स्मितसह इतरत्र चार प्रवाशांचेही विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >