नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्ध संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या शांततेच्या प्रयत्नांची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. पुतिन यांनी म्हटले आहे की, दोन्ही देशांमधील शांततापूर्ण तोडगा शोधण्याबाबत पंतप्रधान मोदी यांच्याकडे अतिशय चांगल्या आणि प्रभावी कल्पना आहेत, तसेच हे युद्ध लवकरात लवकर संपवण्याचा मुद्दा ते सातत्याने उपस्थित करत आले आहेत. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना पुतिन म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे जगातील अशा मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत, जे भारतासोबतचे घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध कायम असतानाही युक्रेनमधील संघर्ष लवकरात लवकर संपवण्याबाबत सतत आग्रही असतात.(Narendra Modi)
भारताची निष्पक्ष भूमिका आणि पुतिन यांचे आभार
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान मोदी दोन्ही बाजूंना मान्य होईल असा तोडगा काढण्यास इच्छुक असून या प्रकरणात ते निष्पक्ष भूमिका बजावत आहेत. पुतिन यांच्या मते, मोदींचा भर हा नेहमीच चर्चेच्या आणि संवादाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर असतो. मोदी यांच्या या शांततापूर्ण विचारांसाठी आणि प्रयत्नांबद्दल पुतिन यांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. “मला वाटते हे स्पष्टपणे सांगणे माझे कर्तव्य आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विचारांसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. शांततापूर्ण मार्गाने आणि शक्य तितक्या लवकर हा संघर्ष संपवण्याच्या त्यांच्या इच्छेसाठीही आम्ही त्यांचे आभारी आहोत,” असे पुतिन यांनी नमूद केले.
वाशिंग्टन, डीसी : इराणचा समावेश असलेल्या संभाव्य मोठ्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या लष्कराने सौदी अरेबिया आणि कतारमध्ये दोन ...
द्विपक्षीय संबंध आणि जागतिक मंच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, भारताचे दोन्ही पक्षांशी असलेले सलोख्याचे संबंध लक्षात घेता, या प्रदेशात लवकरात लवकर आणि कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आणि कटिबद्ध आहे. दरम्यान, दोन्ही नेत्यांची नुकतीच नवी दिल्ली येथे झालेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान भेट झाली होती. या बैठकीत आर्थिक सहकार्य कार्यक्रम 2030, व्यापार, पायाभूत सुविधा, ऊर्जा, संरक्षण, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रांमधील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती.(Vladimir Putin)






