स्वस्त घरांच्या योजनेला अधिक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १० लाख रुपयांपर्यंतच्या या गृह कर्जात स्टँप ड्युटी आणि नोंदणी शुल्काचा समावेश करण्याचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्ली – स्वस्त घरांच्या योजनेला अधिक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १० लाख रुपयांपर्यंतच्या या गृह कर्जात स्टँप ड्युटी आणि नोंदणी शुल्काचा समावेश करण्याचे आदेश दिले आहेत.
हा खर्च घराच्या किंमतीच्या १५ टक्के इतका असतो. त्यामुळे घर खरेदी करणा-या सामान्य वर्गावर याचा अतिरिक्त भार पडतो. यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे.
स्वस्त घरांच्या योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी १० लाखापर्यंतच्या गृहकर्जामध्ये स्टँप ड्युटी, नोंदणी शुल्क, आणि इतर कागदत्रांचा खर्चाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
सध्या गृहकर्ज घेताना बँकेकडून या कर्जात स्टँप ड्युटी, नोंदणी शुल्क आणि इतर कागदपत्रांच्या खर्चाचा समावेश केला जात नाही.
बदलापूर,Titwala ,आसनगाव,सारख्या लांबवरच्या भागात घरे खरेदी करणार्यांना थोडा फार जास्त कर्ज मिळण्यात ह्याचा फायदा होईल,बाकी काही नाही.