Central Railway : मध्य रेल्वेकडून बीड आणि पुणे दरम्यान पहिली दैनंदिन रेल्वे सेवा सुरू; १७ सप्टेंबरला उद्घाटनपर विशेष गाडी धावणार

मुंबई : मराठवाडा विभाग आणि पुणे यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक दृढ करण्यासाठी आणि प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेकडून बीड आणि पुणे दरम्यान पहिली थेट आणि दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि इतरमान्यवरांच्या हस्ते १७ सप्टेंबर २०२६ रोजी बीड रेल्वे स्थानकावरून या बीड-पुणे उद्घाटनपर विशेष गाडीला (गाडी क्र. ०१४०१) हिरवा झेंडा दाखवला जाईल.(Central Railway Beed Pune)


अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अहिल्यानगर-बीड विभागाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरू होणारी ही रेल्वे सेवा या प्रकल्पातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे.



गाडीचे मार्ग आणि थांबे


बीड ते पुणे धावणारी ही उद्घाटनपर विशेष गाडी खालील प्रमुख स्थानकांवर थांबेल:





  • अमळनेर भांड्याचे




  • नवीन आष्टी




  • नारायणडोह




  • अहिल्यानगर




  • श्रीगोंदा रोड




  • दौंड कॉर्ड लाईन




  • उरुळी





डब्यांची रचना (Coach Composition)


ही विशेष गाडी खालील डब्यांच्या संरचनेसह प्रवाशांच्या सेवासांठी उपलब्ध असेल:





  • २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी (AC 2 Tier)




  • ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी (AC 3 Tier)




  • ४ शयनयान श्रेणी (Sleeper)




  • ४ सामान्य द्वितीय श्रेणी (General)




  • १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन




  • १ जनरेटर व्हॅन




तसेच, पुणे-बीड-पुणे दैनंदिन एक्सप्रेस (गाडी क्र. ११४३४/११४३३) ची नियमित सेवा देखील लवकरच सुरू होणार असून, तिच्या वेळा आणि थांब्यांची तपशीलवार माहिती स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल.



बीड आणि पुणे शहरांचे महत्त्व




  • बीड: हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील ऐतिहासिक जिल्हा असून समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. येथे ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर असून, हा जिल्हा परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग व अंबाजोगाई यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या जवळ आहे. हा प्रामुख्याने कृषीप्रधान जिल्हा आहे.(Central Railway Beed Pune)




  • पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि 'पूर्वेकडील ऑक्सफर्ड' म्हणून ओळखले जाणारे पुणे हे एक प्रमुख शैक्षणिक, औद्योगिक आणि आयटी (IT) केंद्र आहे. मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे पुणे हे महत्त्वाचे जंक्शन असल्याने बीड व परिसरातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात.(Central Railway Beed Pune)





नवीन रेल्वे सेवेचे प्रमुख फायदे


१. पहिली थेट रेल्वे जोडणी: बीडला पुण्याशी जोडणारी ही पहिलीच थेट रेल्वे सेवा ठरणार असून, यामुळे हा 'आकांक्षी जिल्हा' भारताच्या प्रवासी रेल्वे नकाशावर अधिकृतपणे येईल.


२. प्रवाशांसाठी सोयीची: शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय उपचार आणि तीर्थयात्रेसाठी पुण्याला प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, रोजचे प्रवासी, व्यापारी, भाविक आणि रुग्णांचा प्रवास सुकर होईल.


३. सामाजिक-आर्थिक चालना: रस्तेमार्गाच्या तुलनेत हा प्रवास जलद, सुरक्षित आणि किफायतशीर होईल. प्रवासाचा वेळ वाचण्यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यटन आणि कृषी उत्पादनांची ने-आण सुलभ होईल.


४. प्रादेशिक एकात्मता: या सेवांमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील संबंध अधिक घट्ट होण्यास मदत होईल.(Central Railway Beed Pune)


मध्य रेल्वे मराठवाडा क्षेत्रातील संपर्क व्यवस्था बळकट करण्यासाठी कटिबद्ध असून, या नवीन रेल्वेमुळे परिसराचा सामाजिक-आर्थिक विकास वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

Ritu Tawde : महापौर निवासस्थानी पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाला भावपूर्ण निरोप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्रीगणेशोत्सव अंतर्गत, दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भक्तीमय वातावरणात बुधवारी १५

Disha Salian Case : सतीश सालियन यांच्या वतीने आदित्य ठाकरेंच्या दाव्यांवर गंभीर आक्षेप; कायदेशीर लढा तीव्र

मुंबई : दिवंगत दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात शिवसेनेचे

FDA Action : अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई; बनावट पनीर, दूध उत्पादने आणि प्रतिबंधित अन्नसाठा मोठ्या प्रमाणावर जप्त

मुंबई : ग्राहकांची दिशाभूल करून आण

Maharashtra Jobs : ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ला नवी बळकटी; महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि सृजन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार

मुंबई : राज्यातील युवकांना त्यांच्या जिल्हा, तालुका आणि स्थानिक परिसरात अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून

Nitin Nabin : नितीन नबीन यांनी घेतले सिद्धिविनायक, लालबागच्या राजाचे दर्शन

- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पहिला मुंबई दौरा; कार्यकर्त्यांकडून ढोल-ताशांच्या गजरात स्वागत मुंबई :

Lalbaugcha Raja Crowd : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासन्‌तास रांग; भाविकांना धक्काबुक्कीचा VIDEO व्हायरल!

मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. अनेक भावि