मुंबई: मुंबई- बेंगळुरू दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई CSMT- बेंगळुरू मार्गावर उद्यान एक्स्प्रेसनंतर आणखी एक एक्स्प्रेस धावणार आहे. रेल्वे बोर्डाकडून लवकरच मुंबई- बेंगळुरू मार्गावर दुसरी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस चालवली जाणार आहे. रेल्वे बोर्डाकडून अद्याप या एक्स्प्रेसची अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र लवकरच ही घोषणा केली जाणार आहे. 22 ते 24 तासांचा प्रवास आता जेमतेम 15 ते 16 तासांपर्यंत येऊन पोहोचणार आहे. या स्लीपर एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.
नवी मुंबई: ठाणे आणि नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणे- बेलापूर मार्गावरील ऐरोली- काटई नाका पुलाच्या कामासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये चार ...
जर तुम्हाला मुंबई CSMT- बेंगळुरू प्रवास करायचा असेल, तर प्रवाशांना उद्यान एक्स्प्रेसचा एकच पर्याय उपलब्ध आहे. यासाठी प्रवाशांना 22 ते 24 तासांचा अवधी लागतो. आता हाच वेळ तब्बल 6 ते 8 तासांनी कमी होणार आहे. मुंबई CSMT- बेंगळुरू मार्गावरील स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसांमध्ये रेल्वे बोर्डाकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई CSMT- बेंगळुरूच्या प्रवाशांकडून सुपरफास्ट ट्रेनची मागणी केली जात होती, अखेर प्रवाशांची ती मागणी पूर्ण होणार आहे.
मुंबई CSMT- बेंगळुरू दरम्यान 1137 किमी इतके अंतर आहे. हे अंतर कापण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसला 16 तासांपेक्षा कमीचा वेळ लागण्याची शक्यता आहे. नवी वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबई CSMT- बेंगळुरू प्रवास 15 ते 16 तासांमध्ये पूर्ण करेल. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस प्रवाशांच्या सेवेमध्ये असणार आहे. मुंबईहून मंगळवार आणि बंगळूरुहून सोमवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस मुंबई CSMT- बेंगळुरू- मुंबई CSMT मार्गावर स्लीपर वंदे भारत ट्रेन धावेल. पूर्ण इलेक्ट्रिफाईड आणि डबल ट्रेक असणारी ही ट्रेन 130 किमी प्रतितास चालण्याची शक्यता आहे. जलद रेल्वे मार्गच्या दृष्टीनेच ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेमध्ये आणली जाणार असून या ट्रेनचा वेळ रात्रीचा असण्याची शक्यता आहे. प्रवाशांची आवश्यकता समोर ठेवून ही ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई: दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या 'फ्लाई- दुबई' कंपनीच्या विमानामध्ये सह वैमानिकाकडून झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यामध्ये कॅप्टन स्मित मच्छार ...
मुंबई CSMT ते बंगळुरूसाठी ही ट्रेन दररोज मुंबईहून रात्री 8.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 11.55 वाजता बंगळुरूला पोहोचेल. तर, बंगळुरू ते मुंबई CSMTसाठी बंगळूरु स्थानकावरून दररोज रात्री 7.50 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 11:55 वाजता मुंबईत पोहोचेल. या संपूर्ण ट्रेनच्या प्रवासासाठी 16 तासांचा अवधी लागत आहे. ह्या ट्रेनसाठी कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, रायचूर, गुंटकल, अनंतपूर आणि धर्मावरम हे प्रमुख थांबे असणार आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे प्रवाशांचा 6 ते 8 तासांचा वेळ वाचणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रेनसाठी 27651 आणि 27652 असा क्रमांक असण्याची शक्यता आहे. अद्याप रेल्वेकडून संपूर्ण ट्रेनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या माहितीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
823 सीट्स असलेल्या ह्या ट्रेनमध्ये एकूण 16 कोचेस असण्याची शक्यता आहे, 11 थ्री टियर एसी, 4 टू टियर एसी आणि 1 फर्स्ट क्लास एसी असे एकूण 16 डब्बे असतील. संपूर्ण ट्रेनमध्ये 823 सीट्स असण्याची शक्यता आहे, सर्व प्रवाशांना बसण्याची आणि झोपण्याची व्यवस्था ट्रेनमध्ये असेल. मुंबई CSMT ते बंगळुरूसाठी रेल्वेकडून दोन स्लीपर रेकची पूर्णपणे वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण ट्रेन प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज, अत्याधुनिक प्रकाशयोजना, सुधारित आणि स्वच्छ बायोटॉयलेट्स, माहिती प्रदर्शन प्रणाली (Information Display Systems), सीसीटीव्ही कॅमेरे आणि फर्स्ट एसीमध्ये विशेष आरामदायी झोपण्याची व्यवस्था उपलब्ध असण्याची शक्यता आहे. व्यावसायिक, पर्यटक आणि सामान्य नागरिक अशा सर्वांसाठीच हा रात्रीचा प्रवास अतिशय आरामदायी आणि वेगवान ठरणार आहे.
मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. विनातिकिट, बनावट तिकिट, दुसऱ्यांचा पास वापरून प्रवास करणाऱ्यांवर आता ...
या संपूर्ण ट्रेनची निर्मिती भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड कंपनीकडून केली आहे. मुंबई CSMT ते बंगळुरूसाठी रेल्वेकडून दोन स्लीपर रेकची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी एक ट्रेन बेंगळुरू कॅन्टोन्मेंटमध्ये आहे तर, दुसरी ट्रेन बंगारापेटच्या वरदापुरा येथे आहे. लवकरच ही ट्रेन दक्षिण पश्चिम रेल्वेकडे सुपुर्द केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रेनसाठी 3000 च्या आसपास भाडं असण्याची शक्यता आहे. दरम्यान, अद्याप रेल्वेकडून संपूर्ण ट्रेनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या माहितीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.



