सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री पी. चिदंबरम सोमवारी संसदेत आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
नवी दिल्ली : सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री पी. चिदंबरम सोमवारी संसदेत आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जुलैपर्यंतची खर्चाची तरतूद असलेल्या या अर्थसंकल्पात उत्पादन शुल्क, सेवा करांमध्ये बदल केले जाऊ शकतात.
तर सामान्य जनतेला डोळय़ासमोर ठेवून अधिकाधिक कल्याणकारी योजनांवर भर देत मंदीशी सामना करणा-या औद्योगिक क्षेत्रासाठीही महत्त्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात.
आगामी निवडणूका लक्षात घेऊन, पी. चिदंबरम जनतेला अनुकूल अर्थसंकल्प सादर करतील अशी अपेक्षा आहे.