जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकणा-या ‘एनोलागे’ या विमानातील अखेरचा कर्मचारी थिओडोर व्हॅन किर्क (९३) यांचे निधन झाले, असे वृत्त अमेरिकेतील ‘एनबीसी’ टेलिव्हिजनने दिले आहे.
वॉशिंग्टन- जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकणा-या ‘एनोलागे’ या विमानातील अखेरचा कर्मचारी थिओडोर व्हॅन किर्क (९३) यांचे निधन झाले, असे वृत्त अमेरिकेतील ‘एनबीसी’ टेलिव्हिजनने दिले आहे.
जॉर्जियातील पार्क स्प्रिंग्ज रिटायरमेंट कम्युनिटी येथील निवासस्थानी किर्क यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ६ ऑगस्ट १९४५ मध्ये हिरोशिमा शहरावर सकाळी ८.१५ वाजता अणुबॉम्ब टाकण्यात आला.
हा अणुबॉम्ब ‘एनोलागे’ या विमानातून नेण्यात आला होता. या विमानात दिशादर्शक म्हणून किर्क काम पाहत होते.
जागतिक युद्धात पहिल्यांदाच अणुबॉम्बचा वापर करण्यात आला होता. यात १ लाख ४० हजार ठार झाले तर तीन दिवसांनी नागासाकी शहरात टाकलेल्या अणुबॉम्बमध्ये ७० हजार ठार झाले. किर्क यांचा दफनविधी ५ ऑगस्ट रोजी पेनिसिल्विनिया राज्यात त्यांचे मूळगाव नॉर्थथंबरलॅँड येथे होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.