ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यामध्ये तुफान खेळी करणारा विराट कोहली सोशल नेटवर्किंग साईटवर अनुष्काची थट्टा करणा-यांवर चांगलाच भडकला आहे.
मुंबई- ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यामध्ये तुफान खेळी करणारा विराट कोहली अनुष्कावर थट्टा करणा-यांवर चांगलाच भडकला आहे. त्याने ‘अनुष्काची थट्टा करणा-यांनो लाज वाटू द्या’, असे ट्विटरवर म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने उपांत्य फेरीत धडक मारली. त्यानंतर सोशल नेटवर्किंग साईटवर अनुष्काबद्दल अनेक थट्टा करणारे मॅसेजेस फिरत आहेत, यावर विराट भडकला.
विराटने सोमवारी सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर एक फोटो अपलोड केला असून त्यावर ‘शेम’ असे लिहिले आहे. तर ‘अनुष्काची थट्टा करणा-यांनो जरा लाज बाळगा, अनुष्काने मला खेळासाठी नेहमी प्रोत्साहन दिले आहे’ असे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. एवढेच नाही तर विराटने इनस्टाग्रामवरही राग व्यक्त केला आहे.
Shame on people for trolling @AnushkaSharma non-stop. Have some compassion. She has always only given me positivity pic.twitter.com/OBIMA2EZKu
— Virat Kohli (@imVkohli)