आयपीएलच्या सातव्या हंगामाच्या पहिल्या टप्प्यातील अखेरच्या सामन्यात हैदराबाद सनरायझर्सने मुंबई इंडियन्सवर १५ धावांनी विजय मिळवला.
दुबई- आयपीएलच्या सातव्या हंगामाच्या पहिल्या टप्प्यातील अखेरच्या सामन्यात हैदराबाद सनरायझर्सने मुंबई इंडियन्सवर १५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत हैदराबादने मुंबईला १७३ धावांचे आव्हान दिले होते.
सातव्या हंगामातील पहिल्या विजयासाठी मुंबईकडून कीरॉन पोलार्डने प्रयत्न केले. मात्र अंतिम षटकात तो बाद झाल्याने मुंबईला पहिला विजय मिळवता आला नाही. खराब सुरुवातीनंतर पोलार्ड आणि रायडू यांनी मुंबईला विजयाजवळ नेले. मात्र हे दोघेही बाद झाल्यामुळे मुंबई विजयापासून दूर गेली. मुंबईकडून पोलार्डने ४८ चेंडूत ७८ धावा केल्या. तर रायडूने ३५ धावा केल्या.
त्याआधी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीकरण्यात आलेल्या हैदराबादला झहीर खानने सुरुवातील दोन धक्के दिले. त्यामुळे त्यांची अवस्था दोन बाद३८ अशी झाली होती. मात्र त्यानतंर डेव्हिड वॉर्नर आणि लोकेश राहुल यांनी तिस-या विकेटसाठी १११ धावांची भागिदारी केली. लोकेश ४६ धावांवर बाद झाला तर वॉर्नरने ६५ धावा केल्या.
हैदराबाद- पाच बाद १७२
मुंबई- सात बाद १५७
सामनावीर- भुवनेश्वर कुमार (हैदराबाद)