पटेल समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांनी नवी दिल्लीत रविवारी पत्रकार परिषद घेतली
नवी दिल्ली – पटेल समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांनी नवी दिल्लीत रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी देशभर आंदोलन कऱणार असल्याचे यावेळी सांगितले.
तसेच जिथे माझी गरज असेल तेथे मी जाईन असा विश्वास त्यांनी यावेळी पटेल समुदयाला दिला. दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाव्यतिरिक्त लखनऊपर्यंत हे आंदोलन नेण्याची योजना असल्याचे पटेल यांनी सांगितले.
तसेच पटेल यांचा राजकीय पक्षाशी संबंध असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी खोडून काढला. इतर राजकीय पक्षांच्या रॅलीला होणारी गर्दी आणि आमच्या आंदोलनातील गर्दी यांच्यात फरक आहे. याचा अर्थ असा नाही की माझ्यापाठी कोणत्या पक्षाचा हात आहे. पटेल समाजातील लोकांची आर्थिक स्थिती पाहता त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.