आशियाई देशांदरम्यान होणा-या आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून स्पर्धेला येत्या २५ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.
नवी दिल्ली – भारत, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या आशियाई देशांदरम्यान होणा-या आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून २५ फेब्रुवारी ते आठ मार्च दरम्यान ही चषक स्पर्धा रंगणार आहे. या चषकातील पहिला सामना श्रीलंका आणि पाकिस्तान दरम्यान फातुल्ला येथे रंगणार आहे. यंदाचा आशिया चषक बांगलादेशमध्ये होणार आहे.
दोन मार्चला भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धी देशांची मिरपूरच्या मैदानात लढत होणार आहे.
यामध्ये ११ सामने होणार असून ढाका येथील मिरपूर आणि फतुल्ला या ठिकाणी हे सामने खेळवले जातील. आशिया चषकाच्या संघात सुरेश रैना, युवराज सिंग यांना डच्चू देण्यात आला आहे.
भारतीय संघ- महेंद्रसिंग ढोणी(कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अंबाती रायडू, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार, वरुण अँरॉन, अमित मिश्रा, ईश्वर पांडे,
» आशिया चषकाचे वेळापत्रक..
» २५ फेब्रुवारी, मंगळवार – पाकिस्तान वि श्रीलंका, फातुल्ला
» २६ फेब्रुवारी, बुधवार – भारत वि बांगलादेश , फातुल्ला
» २७ फेब्रुवारी, गुरुवार – अफगाणिस्तान वि पाकिस्तान, फातुल्ला
» २८ फेब्रुवारी, शुक्रवार – भारत वि श्रीलंका, फातुल्ला
» एक मार्च, शनिवार – बांगलादेश वि अफगाणिस्तान, फातुल्ला
» दोन मार्च, रविवार – भारत वि पाकिस्तान, मिरपूर
» तीन मार्च, सोमवार – अफगाणिस्ता वि श्रीलंका, मिरपूर
» चार मार्च, मंगळवार – बांगलादेश वि पाकिस्तान, मिरपूर
» पाच मार्च, बुधवार – भारत वि अफगाणिस्तान, मिरपूर
» सहा मार्च, गुरुवार – बांगलादेश वि श्रीलंका, मिरपूर
» आठ मार्च, शनिवार – अंतिम सामना