द इन्स्टिय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या परीक्षेत रायगडचा परेश जनार्दन पाटील संपूर्ण भारतात दुसरा आला आहे. परेश रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील सुडकोली या खेडेगावातील आहे.
अलिबाग – द इन्स्टिय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या परीक्षेत रायगडचा परेश जनार्दन पाटील संपूर्ण भारतात दुसरा आला आहे. परेश रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील सुडकोली या खेडेगावातील आहे. परेश अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा असून त्याच्या कुटुंबात आईबाबा आणि त्याच्या चार बहिणीही आहेत. २२ वर्षाचा परेश अत्यल्प उत्पन्न असणा-यांसाठी असलेल्या घरकूल योजनेतून बांधलेल्या घरात राहतो. वडील मुंबईत छोटीशी नोकरी करतात . गावातील मुलांची शिकवणी घेऊन कुटुंबाचा चरितार्थ चालवतो.
अलिबागच्या जे.एस.एम कॉलेजमध्ये परेशने बी. कॉम पूर्ण केले. तेथील अध्यापक प्रा. उदय जोशी यांनी त्याला कंपनी सेक्रेटरीशिप परीक्षेचा मार्ग दाखवला आणि मार्गदर्शनही केले. परेशनेही अथक मेहनत घेऊन १४ तास नियमित अभ्यास केला. राष्ट्रपती व राज्यपाल यांचे प्रशासन, सरकारी कंपन्या यांच्यात असलेल्या सेवा तरूणांना उपलब्ध होऊ शकतात, असे परेश सांगतो. कंपनी सेक्रेटरीशिपच्या परीक्षेला २८ लाख ७२ हजार जण बसले होते. परीक्षार्थींपैकी ६६ हजार जणांनी कॉपोर्रेट शाखेपेक्षा प्रशासकीय क्षेत्राला पसंती दाखवली होती. परेशला या शाखेत १२०० पैकी ११५० गुण मिळाले आणि तो दुसरा आला. ११५२ गुण मिळवून चैनई येथील महिला पहिली आली.