वादग्रस्त विधाने करुन नेहमीच चर्चेत राहणारे न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने पुढील राष्ट्रपती बनावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली – वादग्रस्त विधाने करुन नेहमीच चर्चेत राहणारे न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने पुढील राष्ट्रपती बनावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
प्रेस ऑफ इंडियाचे अध्यक्ष असलेले कटजू यांच्या या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मंगळवारी काटजू यांनी आपल्या खाजगी ब्लॉगवर कतरिना कैफने पुढील राष्ट्रपती बनावे अशी माझी इच्छा आहे असे विधान केले होते. त्यांच्या या हास्यास्पद विधानानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आले होते.
मात्र दुस-याच दिवशी त्यांनी आपल्या या विधानाबद्दल फेसबुकवरुन माफी मागितली. जर या विधानामुळे कोणी दुखावले गेल्यास मी माफी मागतो असे त्यांनी फेसबुकवर म्हटले.
‘मी नेहमीच निवडणुकीत सुंदर महिला अथवा अभिनेत्रीच्या निवडीला पाठिंबा दिला आहे. आपल्याकडील नेते निवडणुकीच्या वेळेस अनेक आश्वासने देतात मात्र ती पूर्ण करत नाहीत. त्यामुळे तर तुम्हाला कोणाला निवडून द्यायचे असेल तर सुंदर चेह-याला मत का देऊ नये. मला वाटते की पुढील राष्ट्रपती कतरिना कैफने व्हावे. एवढे बोलूनही कटजू थांबले नाहीत तर त्यांनी त्यासाठी एक अटही घातली ती म्हणजे शपथविधीच्या वेळेस कतरिनाने शीला की जवानी हे गाणे गायले पाहिजे,असे त्यांनी ब्लॉगवर म्हटले होते.