मी लग्न करुन संसार थाटावा अशी माझ्या आईची इच्छा आहे. तिला मला नववधूच्या पोषाखात पाहायचे आहे.
मी लग्न करुन संसार थाटावा अशी माझ्या आईची इच्छा आहे. तिला मला नववधूच्या पोषाखात पाहायचे आहे. मी ज्या दिवशी जन्मले त्या दिवसापासून मी तिच्यासाठी वधू आहे असे प्रियंका चोप्राने सांगितले.
एका मुलाखतीत प्रियंकाला विवाहाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ती म्हणाली की, लग्न हा आयुष्यातील महत्वाचा निर्णय आहे. तो घाईगडबडीत घेण्याचा निर्णय नाही. जो जोडीदार तुमच्या जीवनात येईल त्याच्या आयुष्यात फक्त तुमचेच स्थान असले पाहिजे. अशा जोडीदारासाठी मला वाट पहावी लागली तर, मी थांबायला तयार आहे.
तुझ्या आयुष्यात कोणी आहे का ? या थेट प्रश्नावर प्रियंका म्हणाली की, जर कोणी माझ्या आयुष्यात असेल तर निश्चितच तुम्हाला कळेल असे उत्तर दिले.