बॉलिवूडचा ‘धमाल’ फेम चित्रपटातील अभिनेता आशिष चौधरी ‘खतरो के खिलाडी’ डर का बलॉकब्लास्टर रिटर्न्सचा विजेता ठरला आहे.
मुंबई- बॉलिवूडचा ‘धमाल’ फेम चित्रपटातील अभिनेता आशिष चौधरी ‘खतरो के खिलाडी’ डर का बलॉकब्लास्टर रिटर्न्सचा विजेता ठरला आहे. आशिषने फायनलमध्ये इकबाल खान, सागरिका घाटगे आणि मयंग चॅन्गवर मात करत जेतेपद पटकावले आहे. ”मी या शोचा विजेता ठरलो, यावर माझा विश्वास बसलेला नाही, असे त्याने आपला आनंद व्यक्त करतांना सांगितले.
आशिषला या शोमध्ये २५ लाख रुपये आणि न्यू जनरेशन महिंद्रा स्कॉपिओ कार मिळाली आहे. त्याला कलर्स चॅनेलवर सहभागी होऊन आपली नवीन ओळख निर्माण करायची असल्याचे त्याने सांगितले.
तो पुढे म्हणाला की, मी या शोमध्ये आनंद घ्यायला आणि मैत्री करण्यासाठी सहभागी झालो होतो. जिंकू शकेल याचा मी विचारही केला नव्हता. आपल्यातली भिती नाहीशी झाली की मग आपण कुठेही कमी पडत नाही, असे त्याने सांगितले. ‘खतरो के खिलाडी’ हा शो १६ फेब्रुवारीला चालू झाला. यामध्ये अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.