गुजरातमधील विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने गुजरात सरकारला राज्यातील चार जिल्हाधिकारी व पाच आयपीएस अधिका-यांची बदली करण्याचे निर्देश दिले आहेत.
नवी दिल्ली- विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने गुजरात सरकारला राज्यातील चार जिल्हाधिकारी आणि काही आयपीएस अधिका-यांची बदली करण्याचे निर्देश दिले आहेत.
बनासकंथा, साबरकंथा, दाहोड आणि तापी येथील जिल्हाधिकारी आणि जामनगरचे पोलिस अधिक्षक एच. के. पटेल, पाटणचे पोलिस अधिक्षक एम. एस. भारडा, सुरतचे पोलिस उपायुक्त एन. डी. सोलंकी, अहमदाबाद गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त ए. के. शर्मा आणि अहमदाबाद गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त हिमांशू शुक्ला या अधिका-यांची बदली करण्यात आली आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि या आयपीएस अधिका-यांची जवळीक असल्याची तक्रार विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांची बदली केली आहे.