दहावीत कमी गुण मिळाले, आता आपलं करिअरच संपलं, म्हणून कित्येक विद्यार्थी निराश होतात. असे विद्यार्थी केवळ नाइलाज म्हणून तांत्रिक शिक्षणाकडे वळताना दिसतात. मात्र या विषयात रस असूनदेखील ज्या मुलांना अधिक गुण मिळतात ते विद्यार्थी याकडे वळू शकत नाही. कारण या क्षेत्रातही करिअरच्या भरपूर संधी आहेत याची खूपच कमी जणांना माहिती आहे.
ब-याचदा पारंपरिक शिक्षणात आपल्याला रस नसल्याचं कळून येतं. काही विद्यार्थ्यांना तांत्रिक विषयात उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल, प्लंिबग, फिटिंगची आवड असते तर काही मुलांना गाड्यांच्या दुरुस्तीमध्ये रस असतो तर काहींना इतर काही तांत्रिक बाबींमध्ये. ब-याचदा लहानपणीचा हा रस मुलांच्या करिअरचा पाया बनू शकतो हे आपल्या लक्षात येत नाही. दुसरीकडे बरीच मुलं अभ्यासात गती नाही म्हणून निराश होतात आणि त्यांना आता करण्यासारखं काही नाही असं वाटतं. ग्रामीण भागात विशेषत: जिथे संधी कमी उपलब्ध आहे तिथे हा प्रश्न अधिक जाणवतो. अशा वेळेस काही थातूर मातुर काम करून मुलं पोट भरतात. या सगळ्यासाठी तांत्रिक शिक्षण हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. आयटीआय आणि डिप्लोमा करून नोकरीच्या पुष्कळ संधी उपलब्ध होतात आणि स्वयंरोजगाराच्याही वाटा खुल्या होतात.
तांत्रिक शिक्षणातील संधी कुठे आहेत?
आयटीआय
आयटीआयमध्ये ब-याच कोस्रेसना प्रवेश घेता येतो. यात ऑटोमोबाइल, ड्राफ्टमन, इलेक्ट्रिशिअन, टीव्ही-रेडिओ मेकॅनिक, वेल्डर, टूल मेकिंग, फोटोग्राफी, डेटा एन्ट्री, इव्हेंट मॅनेजमेंट असे अनेक कोस्रेस असतात.
संपर्क
भेंडीपाडा, कल्याण-बेलापूर रोड, अंबरनाथ (प.)
३७४, साने गुरुजी मार्ग, आग्रीपाडा पोलिसस्थानकाजवळ, मुंबई-११
पात्रता : दहावी उत्तीर्ण
अनेक सरकारी कंपन्यांमध्ये आणि शासकीय नोक-यांमध्ये आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आवश्यकता असते. रेल्वे, सरकारी गोदी उदा. माझगाव डॉक, सरकारी कंपन्या, विद्युत कंपन्या यांमध्ये मोठय़ा प्रमाणात आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी घेतले जातात. मात्र दुर्दैवाने विद्यार्थ्यांना अशा संधींची माहिती नसते. त्यामुळे उत्तम पैसा देणा-या संधींचा फायदा मराठी मुलं घेताना दिसत नाहीत.
डिप्लोमा कोर्सेस
या व्यतिरिक्तअनेक शासकीय आणि खासगी संस्थांमध्ये तांत्रिक विषयांमध्ये डिप्लोमा कोस्रेस उपलब्ध असतात. इंटिरिअर डेकोरेटर, इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी, सिव्हिल इंजिनिअिरग, इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअिरग अशा इंजिनिअरींगच्या अनेक शाखांमध्ये डिप्लोमा उपलब्ध आहे.
काही प्रथितयश संस्थांची नावं :
- कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ुट, कोहिनूर भवन, सेनापती बापट मार्ग. दादर (प.)
- ठाकूर पॉलिटेक्निक, कांदिवली(पूर्व)
- नॅशनल टेक्निकल, कुर्ला (प.)
- शासकीय तंत्रनिकेतन, वांद्रे आणि ठाणे
होम सायन्स
होम सायन्स हा विशेषत: स्त्रियांसाठी एक उत्तम करिअर पर्याय आहे. हाउसकीिपग आणि होम सायन्समध्ये घर चालवण्याविषयीचं प्रशिक्षण असतं आणि या ज्ञानाचा उपयोग पुढे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करता येऊ शकतो.
संपर्क संस्था
निर्मला निकेतन, न्यू मरीन लाइन्स, मुंबई
हाउसकीपिंग
हाऊस कीपिंग हा तांत्रिक शिक्षणाचा भाग आहे. आयटीआयमध्ये हा कोर्स शिकवला जातो. अनेक पीडब्ल्यूडी कंत्राटांमध्ये हाउसकीपिंगची गरज असते. या ठिकाणी नोकरी आणि स्वयंरोजगार अशा दोन्ही संधी उपलब्ध आहेत.
त्यामुळे दहावीत तुम्हाला कमी मार्क मिळाले किंवा तुम्हाला तांत्रिक शिक्षणाची अधिक गोडी असेल तरी त्यात अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे पारंपरिक शिक्षणाला फाटा देऊन नवीन करिअरची साथ पकडा आणि यशस्वी व्हा.