नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा या अंतराळ संशोधन संस्थेने मंगळ ग्रहावर पाठवलेल्या क्युरिओसिटी रोव्हरला मंगळावर एक वर्ष पूर्ण झाले आहे.
मुंबई – नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा या अंतराळ संशोधन संस्थेने मंगळ ग्रहावर पाठवलेल्या क्युरिओसिटी रोव्हरला मंगळावर एक वर्ष पूर्ण झाले आहे. ऑगस्ट २०१२ मध्ये नासाचे हे अंतराळवाहन मंगळवार पोहोचले होते. आतापर्यंत त्याने मंगळाच्या पृष्ठभागावर ६८७ दिवस वास्तव्य केले आहे.
मंगळ ग्रहावर जीवसृष्टीसाठी अनूकूल वातावरण आहे का याचा शोध लावणे हा क्युरिओसिटी रोव्हर पाठवण्यामागचा नासाचा मुख्य हेतू आहे. याआधी या अंतराळवाहनाने मंगळवारील खडकांमधून काढलेल्या मातीचे परीक्षण करुन त्यासंदर्भातील छायाचित्रे पृथ्वीकडे पाठवली होती.
पाणी तसेच जीवसृष्टीसाठी अनूकूल असे घटक रासायनिक घटक या मातीच्या परीक्षणात आढळले होते. जीवसृष्टीसाठी अनूकूल घटक मंगळग्रहावर आढळल्याने मंगळवार कधी काळी जीवसृष्टी असावी, असा निष्कर्ष नासाने काढला होता.