पत्नीची काळजी घेऊ न शकणारी तसेच महिलांचा आदर न करणारी व्यक्ती देशाची सेवा काय करणार, असा सवाल उपस्थित करत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर शनिवारी टीका केली.
नवी दिल्ली- पत्नीची काळजी घेऊ न शकणारी तसेच महिलांचा आदर न करणारी व्यक्ती देशाची सेवा काय करणार, असा सवाल उपस्थित करत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर शनिवारी टीका केली.
मोदींच्या मनात स्त्रियांबद्दल थोडा जरी सन्मान असता तर त्यांनी निवडणूक अर्जामध्ये आपल्या पत्नीचे नाव दिले असते. मोदी यांनी विवाहासंदर्भातील माहिती का लिहिली नाही, ते अविवाहित आहेत किंवा त्यांनी आपल्या पत्नीला का सोडून दिले, याबाबतची माहिती त्यांनी का दिली नाही.
जशोदाबेन असे त्यांच्या पत्नीचे नाव सांगितले जाते. त्या अजूनही एका भाडयाच्या घरात राहतात. त्यांच्या निवासासाठी मोठे घर का दिले गेले नाही, असा सवालही त्यांनी केला. ते एक मोठे व्यक्ती आहेत असे म्हणतात, तर त्यांनी आपल्या पत्नीसाठी सोयी का उपलब्ध करून दिल्या नाहीत. ज्यांच्या मनामध्ये महिलांसाठी आदर नाही, तो देशाची सेवा कशी करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.