मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन टेम्पो आणि कार यांच्यात पहाटे झालेल्या अपघातात तीन जण ठार तर अन्य तीनजण जखमी झाले.
पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन टेम्पो आणि कार यांच्यात पहाटे पावणेदोन वाजता सडवली गावाजवळ झालेल्या अपघातात कारमधील तीन प्रवासी जागीच ठार झाले. तर दोन्ही टेम्पो चालकासह अन्य एकजण जखमी झाला.
या अपघातात इंडिगोमधील बाळासाहेब डेव्हिड त्रिभुवन (३७), अमोल प्रमोद कळांबे (३६) आणि अतुल प्रमोद कळांबे (२०) या तिघांचा मृत्यू झाला.
तर टेम्पोचालक अकबर अली खान (३४) व टेम्पोत असलेला अब्दुल हमजा (२७) आणि दुस-या टेम्पोचा चालक जयवंत घाडगे (३८) हे तिघेजण जखमी झाले. सर्व जखमींवर निगडीतील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.