मायक्रोसॉफ्ट कंपनीचे को-फाऊंडर आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचाच फोन वापरत असतील असे आपल्याला वाटत असेल.
वॉशिंग्टन- मायक्रोसॉफ्ट कंपनीचे को-फाऊंडर आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचाच फोन वापरत असतील असे आपल्याला वाटत असेल. मात्र, नुकताच त्यांनी आपण विंडोज नव्हे तर अँड्रॉईड फोन वापरत असल्याचा खुलासा केला. एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितले की, काही दिवसांपूर्वीच त्यांनी अँड्रॉईड वापरण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा फोन नेमका कोणता असेल, हे सांगायचे त्यांनी टाळले. त्यामुळे साहजिकच ते कोणता अँड्रॉईड फोन वापरत असतील, याबाबतच्या चर्चाना उधाण आले आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीने सॅमसंगसोबत टायअप केले असल्याने त्यांची पसंती सॅमसंगच्या गॅलॅक्सी एस ८ ला या मोबाईलला असेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, त्याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळाली नाही. या मुलाखतीत गेट्स यांना तुम्ही आता आयफोन वापरणार का, असे विचारले असता, त्यांनी हसतच ‘नाही, आयफोन नाही’असे उत्तर दिले.
विंडोज फोनवरून शिफ्ट होण्याचा विचार करत असलो तरीही आयफोन वापरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आयफोनसाठी अॅप्लिकेशन तयार करणा-या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे प्रमुख अँड्रॉईड फोन वापरणार असल्याने सर्वच स्तरातून आष्टद्धr(155)र्य व्यक्त होत आहे. मात्र, त्यांनी अॅपल अतिशय चांगले काम करत असल्याचेही म्हटले.