जागतिक कीर्तीचे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा हे मुंबई भेटीवर आले असून विद्याविहार येथील के.जे. सोमय्या परिसरात बौद्ध शिक्षा शिकवणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
मुंबई- जागतिक कीर्तीचे तिबेटन बौद्ध धर्मगुरू दलाई लामा हे मुंबई भेटीवर आले आहेत. नालंदा शिक्षा व सोमय्या विद्याविहार संस्था यांनी मुंबईतील विद्याविहार येथील के.जे. सोमय्या परिसरात बौद्ध शिक्षा शिकवणीचा ३० मे ते दोन जून दरम्यान कार्यक्रम आयोजित केला आहे. यात मुंबईकरांना दलाई लामा यांच्याकडून पहिल्यांदाच चार दिवस बौद्ध जीवनमार्ग शिकवणीसंदर्भातील मार्गदर्शन मिळणार आहे.
चार दिवस होणा-या या कार्यक्रमात दलाई लामा ‘लिव्हिंग, लव्हिंग, लाफिंग अँड डाइंग : दि बुद्धिस्ट वे’ या विषयावर प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी होणा-या दोन सत्रांत मार्गदर्शन करणार आहेत.