केंद्रात सरकार स्थापनेच्या दृष्टीने भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळातील संभाव्य दावेदार नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिका-यांची भेट घेत आहेत.
नवी दिल्ली – केंद्रात सरकार स्थापनेच्या दृष्टीने भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळातील संभाव्य दावेदार नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिका-यांची भेट घेत आहेत.
सोमवारी सकाळी गुजरात भवनमध्ये नरेंद्र मोदींनी अमित शहा आणि वरिष्ठ नेते अरुण जेटली यांच्याबरोबर चर्चा केली. या बैठकीत मंत्रिमंडळातील संभाव्य नावांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. संभाव्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी भाजपचे नव्याने निवडून आलेले खासदार संघाच्या कार्यालयात जाऊन संघ पदाधिका-यांच्या गाठीभेटी घेत आहेत.
उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते कल्याण सिंह यांनीही सोमवारी सकाळी नरेंद्र मोदींची भेट घेतली. रालोअमधील प्रमुख घटक पक्ष असणा-या शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे आणि टीडीपीचे प्रतिनिधी उद्या नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या अशोका रोडवरील निवासस्थानीही भाजप नेत्यांच्या गाठी-भेटी होत आहेत.