शाळेप्रमाणेच महसूल विभागाने केलेल्या ग्रंथालयांच्या पडताळणीत राज्यातील ३८५ ग्रंथालये बोगस असल्याचे आढळले आहे.
जालना– शाळेप्रमाणेच महसूल विभागाने केलेल्या ग्रंथालयांच्या पडताळणीत राज्यातील ३८५ ग्रंथालये बोगस असल्याचे आढळले आहे. या सर्व ग्रंथालयांची मान्यता रद्द केली जाणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी केली.
शासकीय अनुदानावर मिळणा-या शाळांप्रमाणेच ग्रंथालयाच्या बोगसगिरीला आळा घालण्यासाठी शासनाने ही पडताळणी सुरू केली होती. यात राज्यातील ४० टक्के ग्रंथालयांत त्रुटी आढळल्या. तर मराठवाडा विभागातील ४२७२ सार्वजनिक ग्रंथालयांपैकी केवळ १८२५ ग्रंथालये शासकीय निकषांचे पालन करत असल्याचे आढळले. किरकोळ स्वरूपाच्या त्रुटी असलेल्या सुमारे पावणेदोन हजार ग्रंथालयांना सुधारणा करण्याची नोटिस दिली आहे.