युरोपमधील सर्वात श्रीमंत ‘सॉकर’ क्लब म्हणून रेआल माद्रिदने सलग आठव्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले.
लंडन– युरोपमधील सर्वात श्रीमंत ‘सॉकर’ क्लब म्हणून रेआल माद्रिदने सलग आठव्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले. बार्सिलोना आणि मँचेस्टर युनायटेडने अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान कायम राखले.
स्पॅनिश ला लिगा विजेत्या माद्रिदची मिळकत ५१.२६ कोटी युरोवर गेली आहे. पन्नास कोटी युरोचा टप्पा पार करणारा तो पहिला स्पोर्ट्स क्लब ठरला. ४८.३० कोटी युरो मिळवत बार्सिलोनाने माद्रिदपाठोपाठ स्थान राखले आहे. या दोन्ही क्लबचे २०११-१२ मोसमातील उत्पन्न सात टक्क्यांनी वाढले. सर्वात श्रीमंत क्लबमधील पहिल्या सहा संघात काहीही बदल नाही. मँचेस्टर युनायटेडचे उत्पन्न तीन टक्क्यांनी घटले तरी ते तिस-या स्थानी आहेत. युनायटेडपाठोपाठ बायर्न म्युनिच, युरोपियन चँपियन चेल्सी आणि आर्सेनल आहेत.