चित्रपटाच्या शूटींग दरम्यान दरवाजा कोसळल्याने अभिनेता शाहरुख खान जखमी झाला असून त्याला नानावटी रुग्णालयात दाखल केले आहे.
मुंबई- ‘हॅपी न्यू इअर’ चित्रपटाच्या शूटींग दरम्यान अभिनेता शाहरुख खानच्या अंगावर दरवाजा कोसळला. यात शाहरुख जखमी झाला आहे. चेह-यावर रक्तस्त्राव होत असल्याने त्याला उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल केले आहे.
शाहरुख खान सध्या मुंबईतील जुहू येथे जे डब्ल्यू मॅरियट या हॉटेलमध्ये ‘हॅपी न्यू इअर’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. शूटींग चालू असतानाच हॉटेलचा दरवाजा शाहरुखच्या तोंडावर आपटला.
प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फराह खान यांच्या ‘हॅप्पी न्यू ईयर’ या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन, सोनू सूद आणि बोमन इराणी यांच्या प्रमूख भूमिका आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.