धनंजय मुंडे यांना प्रमिलाताई, शकुंतलाताई व उर्मिलाताई या तीन बहिणींनी राखी बांधल्या.
परळी- धनंजय मुंडे यांना प्रमिलाताई, शकुंतलाताई व उर्मिलाताई या तीन बहिणींनी राखी बांधल्या. मात्र काही वर्षापूर्वी दुरावा निर्माण झालेल्या पंकजाताई यांनी पाठ फिरवल्याने दोघा बहिण भावातील नात्यातील दुरावा कायम राहिल्याची खंत दोघांनाही वाटते.
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे भाऊ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून दुरावा आहे. या बहीण-भावांमधील राजकीय वाद महाराष्ट्राने वारंवार पाहिले आहेत.
तरीही मोठा भाऊ हा साक्षात आई-वडीलांसमान समान असतो; म्हणूनच मी धनंजयदादावर लहान बहिणीप्रमाणे प्रेम केले, अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी बाबत खंत व्यक्त केली.
तर पंकजाताईंसोबतच्या दुरावलेल्या नात्यातला दुरावा कमी करण्यासाठी घरातला मोठा व्यक्ती म्हणून आपली दोन पाऊले कधीही पुढे असतील, असे धनंजय मुंडे म्हणाले होते.
परंतू नात्यातला हा दुरावा मिटण्यासाठी दोन्ही बाजूने त्या पद्धतीचा संवाद लागतो. मात्र परिणाम एवढे बिघडलेत की आता संबंध सुधारणे फारच जिकरीचे झाले आहे.