नोटाबंदी प्रकरणी देशभरातील सर्व याचिकांवर २३ नोव्हेंबर रोजी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मंजुरी दिली.
नवी दिल्ली- नोटाबंदी प्रकरणी देशभरातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालय किंवा एका उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याबाबत २३ नोव्हेंबर रोजी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मंजुरी दिली.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर व न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर केंद्र सरकारचे महाधिवक्ता मुकूल रोहटगी यांनी बाजू मांडून सर्व याचिकांच्या हस्तांतर करण्याची मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या सुनावणीनंतर केंद्र सरकारने हस्तांतर याचिका दाखल केली.