ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.
मुंबई- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मुंडे परिवारात पोकळी निर्माण झाली होती. ती भाऊ या नात्याने महादेव जानकरांनी भरून काढली आहे.
बीडच्या राजकारणात पंकजा विरुद्ध त्यांचे सख्खे चुलत बंधू धनंजय असा सामना नेहमी होत असतो. मात्र जेव्हा जेव्हा पंकजा वादात आल्या, तेव्हा तेव्हा जानकरांनी पंकजा यांची पाठराखण केली. त्यामुळे भाऊ-बहीण नाते कसे असावे याचे उदाहरण म्हणून पंकजा मुंडे-महादेव जानकर यांचा आदर्श दिला जातो.
महादेव जानकर हे आपल्या या लाडक्या बहिणीला नेहमी गिफ्ट देत असतात. यावेळी काय गिफ्ट दिले असेल याची चर्चा आता रंगू लागली आहे.