मुंबई: प्रसिद्ध व्हिडिओ जॉकी (VJ) नफिसा जोसेफ हिच्या बहुचर्चित आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने व्यावसायिक गौतम खंडजुआ यांना मोठा धक्का दिला आहे. नफिसाच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या खंडजुआ यांचा दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला असून, त्यांच्यावरील खटला पुढे चालवण्याचे निर्देश दिले आहेत. मृत्यूपूर्वीची परिस्थिती खटला चालवण्यासाठी पुरेशी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.(Nafisa Joseph case)
नेमके प्रकरण काय?
सुप्रसिद्ध व्हीजे आणि मॉडेल नफिसा जोसेफ हिने, व्यावसायिक गौतम खंडजुआसोबत ठरलेल्या विवाहाच्या काही दिवस आधी, २९ जुलै २००४ रोजी अंधेरी येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या दोघांचा मे २००४ मध्ये साखरपुडा झाला होता आणि ७ ऑगस्ट रोजी त्यांचा विवाह ठरला होता, ज्यासाठी निमंत्रण पत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या.(Nafisa Joseph case)
नवी मुंबई: गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरामधून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रचंड गर्दीमुळे शनिवारी सायन-पनवेल ...
विवादाचे कारण आणि घडामोडी:
नफिसाने गौतम खंडजुआ याच्या आधीच्या लग्नाबाबत घटस्फोटाची कागदपत्रे मागितल्यानंतर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. खंडजुआने यापूर्वीच परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याचे सांगितले होते, मात्र वारंवार मागणी करूनही कागदपत्रे सादर केली नाहीत.(Nafisa Joseph case)
घटनेच्या एक दिवस आधी, २८ जुलै रोजी नफिसाच्या आईने मुंबईत येऊन खंडजुआ यांना घटस्फोटाच्या कागदपत्रांबद्दल जाब विचारला. दुसऱ्या दिवशी सकाळी, नफिसाने खंडजुआला त्याच्या लग्नाच्या इराद्याबाबत विचारले असता, त्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रकारानंतर नफिसा अत्यंत अस्वस्थ झाली. तिची आई आणि मैत्रीण पूनम दमानिया हिने खंडजुआला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो संपर्क होऊ शकला नाही. नैराश्यात आलेल्या नफिसाने स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेत ओढणीने टोकाचे पाऊल उचलले.(Nafisa Joseph case)
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी मुंबईतील १० हजार बूथवर दिवे प्रज्वलित करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि ...
न्यालयात युक्तिवाद आणि निरीक्षण:
खंडजुआ यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अशोक मुंडारगी यांनी युक्तिवाद केला की, आरोपपत्रात त्यांच्या पक्षकाराकडून कोणतीही धमकी, चिथावणी किंवा अपमानाचे कृत्य दिसून येत नाही. केवळ लग्नास नकार देणे म्हणजे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे नव्हे, असा दावा त्यांनी केला. मात्र, फिर्यादी पक्षाने युक्तिवाद केला की, लग्नाच्या अगदी ऐन वेळी दिलेला नकार आणि त्यामुळे झालेली नाचक्की यामुळे नफिसाला टोकाचा मानसिक त्रास झाला होता.(Nafisa Joseph case)
न्यायमूर्ती एम. एम. साथाये यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर स्पष्ट केले की, खंडजुआ यांचे वर्तन चिथावणीखोर होते की नाही, हे खटल्याच्या सुनावणीदरम्यान पुराव्यांची छाननी केल्यानंतरच स्पष्ट होईल. दोषमुक्तीच्या टप्प्यावर या प्रकरणाचा सखोल तपास टाळता येणार नाही, असे सांगत न्यायालयाने त्यांची पुनरीक्षण याचिका फेटाळली. तसेच प्रकरणाचा दीर्घ काळ लोटल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने सुनावणीवरील स्थगिती उठवली असली, तरी ती पुढील सहा आठवड्यांसाठी अंतरिम स्वरूपात कायम ठेवली आहे.(Nafisa Joseph case)