फेमिना मिस इंडिया सोबतच २००० साली मिस वर्ल्ड झालेली प्रियांका चोप्रा साध्याची बॉलीवूडमधली आघाडीची अभिनेत्री आहे.
फेमिना मिस इंडिया सोबतच २००० साली मिस वर्ल्ड झालेली प्रियांका चोप्रा साध्याची बॉलीवूडमधली आघाडीची अभिनेत्री आहे. प्रियांकाने अमेरिकेतल्या बोस्टनमधून आपलं दहावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी आपण सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा गुन्हेगारी विषयातील मानसशास्त्रज्ञ व्हावं अशी तिची इच्छा होती. त्यानंतर तिने मार्टीनियर गर्लस् कॉलेज आणि मारिया गोरेटी महाविद्यालय येथून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. तमिळ चित्रपटाद्वारे तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असले तरी लगेचच ती बॉलीवूडकडे वळली. ‘हिरो’ हा तिचा पहिला चित्रपट. याचित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली नाही. मात्र त्यानंतर ‘ब्लफमास्टर’, ‘टॅक्सी नं ९२११’, ‘क्रिश’, ‘डॉन’, ‘फॅशन’, ‘दोस्ताना’ या चित्रपटांमधल्या प्रियांकाच्या भूमिका विशेष गाजल्या.