वास्तुशास्त्र टिप्स
झोपताना पाय दक्षिणेला किंवा पूर्वेला करू नयेत. उत्तरेला किंवा पश्चिमेला करावेत.
बेडसमोर आरसा नसावा. लाल भडक रंगाची चादर किंवा बेडशीट वापरू नये.
बेड चौकोनी किंवा आयताकृती असावा. बेड खाली स्टोरेज नसावे.
झोपताना मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर बेडच्या जवळ ठेवू नये.
बेडच्या खाली कागदी कपामध्ये खडे मीठ ठेवावे ते दर १५ दिवसांनी बदलावे.
झोपण्याच्या आधी देवाचे नामस्मरण करून झोपावे, म्हणजे शांत झोप लागते.
मुलांच्या अभ्यासासाठी वास्तुशास्त्र
- मुलांना पूर्व किंवा उत्तरेला तोंड करून अभ्यासाला बसवावे.
- मुलांनी झोपताना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करावेत.
- अभ्यासाची खोली ईशान्य दिशेला किंवा मध्य उत्तरेला करावी.
- मुलांच्या खोलीमध्ये भडक रंगाचा वापर करू नये.
- मुलांच्या बेडरूमला शक्यतो पूर्व आणि व उत्तरेला खिडक्या असाव्यात.
- मुलांची कपाटे उत्तर किंवा पूर्वमुखी असावीत.
- अभ्यासिकेमध्ये किंवा बेडरूममध्ये जास्त अडगळ तसेच कपाटे ठेवू नयेत.