आज दीपपूजन. आषाढी अमावस्येला केली जाणारी दीपपूजा, म्हणजे घरातील सर्व दीप तेजोमय करून मांडून केलेली आरास. तिन्हीसांजेला घरातील सर्व दिव्यांची पूजा करून अध्यात्माचं एक रूप घरोघरी जपलं जाताना दिसतं.
दीपपूजा करण्यापूर्वी घरातील सर्व दिव्यांची केली जाणारी आरास आणि उजळून निघणारं घर पाहता, दीपपूजेचं महत्त्व हे घरात प्रसन्नता निर्माण करणारं ठरतं. या दिवशी केली जाणारी दीपपूजा ही महत्त्वपूर्ण ठरते.
घरामध्ये सुवासिनींनी पूजा केल्यानंतर, घरातील बाकी सुवासिनी, कुमारिकांना हळदीकुंकू दिले जाते. प्रसादाचं वाटप केलं जातं.
घरात केलं जाणारं दीपपूजन, दिव्यांची केलेली मांडणी ही लक्ष्मीचं रूप मानलं जातं. यामध्ये छोटय़ा-छोटय़ा पणत्यांपासून देवघरातील दिवे, निरांजनं, मोठय़ा समई आदी दिव्यांचं पूजन करून दीपपूजेचं महत्त्व जपलं जातं.
ही परंपरा वर्षानुवष्रे परंपरागत जपली जाते. तिन्हीसांजेला घराघरातून तेजोमय होणारं दिव्यांचं हे रूप सात्त्विकता आणि श्रद्धा संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं.