रेल्वे प्रवासात लोकलमध्ये विसरलेली प्रवाशांचे साडेतीन लाख रुपये किमतीचे सोने असलेली बॅग डोंबिवली रेल्वे पोलिसांनी संबंधित प्रवाशाला परत केली आहे.
डोंबिवली – रेल्वे प्रवासात लोकलमध्ये विसरलेली प्रवाशांचे साडेतीन लाख रुपये किमतीचे सोने असलेली बॅग डोंबिवली रेल्वे पोलिसांनी संबंधित प्रवाशाला परत केली आहे. योगेश शहा असे त्या प्रवाशाचे नाव असून बॅग मिळताच शहा यांच्या चेह-यावर आनंद पसरला असून पोलिसांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
घाटकोपरमधील योगेश शहा हे कामानिमित्त घाटकोपर ते छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करत होते. मात्र लोकलच्या डब्ब्यातच ते बॅग विसरून गेले. त्यांच्या बॅगत ५० हजार रुपये रोख, सोन्याच्या अंगठय़ा, कर्णफुले असा साडेतीन लाखांचा ऐवज, डेबिट कार्ड व शेअर मार्केटची कागदपत्रे होती.
शहा यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पोलिस ठाण्यात बॅग विसरल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी ही माहिती हेल्प लाइनला कळवली होती. प्रथम श्रेणीच्या डब्ब्यात पोलिस तपासणी करत असतानाच डोंबिवली रेल्वे पोलिसांना ही बॅग एका लोकलमध्ये आढळून आली.
बॅगची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी ही बॅग शहा यांच्या हवाली केली. हरवलेली बॅग मिळताच शहा यांचा जीव भांडय़ात पडला. डोंबिवली पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक एच. टी. जगताप, पोलिस शिपाई एस. एस. म्हेत्रे यांनी ही बॅग शोधून काढल्याने त्यांचेही कौतुक होत आहे.
ह्याला म्हण तात नरेंद्र मोदींचे राज ,!!