देवरूख नगरपंचायतीच्या इतिहासातील पहिल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने १२ जागा घेऊन सत्ता काबीज केली आहे.
देवरूख- देवरूख नगरपंचायतीच्या इतिहासातील पहिल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने १२ जागा घेऊन सत्ता काबीज केली आहे. पहिल्या प्रभागाच्या निकालापासून युतीने विजयाची घोडदौड सुरू ठेवत प्रभाग क्रमांक दोन व तीन मध्ये सर्वच्या सर्व जागा खिशात टाकल्या. या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश बने यांना पराजयाला सामोरे जावे लागले आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस यांची न झालेली आघाडी शिवसेना युतीच्या चांगलीच पथ्यावर पडली. विजयी उमेदवारांमध्ये शिवसेना सात, भाजप पाच, राष्ट्रवादी तीन, कुणबी सेना एक व काँग्रेस एक असा समावेश आहे.
सेनेच्या हेगशेटये, कल्पना केसरकर, मंगेश शिंदे, मनीष सावंत, प्रमोद पवार, आश्विनी सावंत, नंददीप बोरुकर तर भाजपचे जयंत राजवाडे, स्वाती राजवाडे, नीलेश भुरवणे, मेघा बेर्डे, निकिता रहाटे यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या स्मिता लाड, प्रफुल्ल भुवड, मिताली तळेकर, अपक्ष उमेदवार युयत्सू आर्ते, कुणबी सेनेच्या वैभवी पर्शराम, काँग्रेसचे माजी उपसरपंच अभिजित चंद्रकांत शेटये यांनीही या निवडणुकीत बाजी मारली.
या निवडणुकीत शिवसेना युतीने राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रवींद्र माने, पालकमंत्री भास्कर जाधव व काँग्रेसचे माजी आमदार सुभाष बने यांना चपराक देत एकहाती विजय मिळवला. राष्ट्रवादी व काँग्रेस यांची आघाडी न झाल्यामुळे या दोनही पक्षांना पराभवाला सामोरे जावे लागले. याचा फायदा शिवसेना युतीने अलगद उचलल्याचे बोल सामान्य मतदारांमधून मतमोजणी स्थळी उमटत होते.
KHUP CHAAN JHALE