ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि क्रिकेट जगतातील नामवंत समालोचक रिची बेनॉ यांचे शुक्रवारी सिडनीत निधन झाले.
सिडनी- ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि क्रिकेट जगतातील नामवंत समालोचक रिची बेनॉ यांचे शुक्रवारी सिडनीत निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. बेनॉ यांचे झोपेतच निधन झाल्याचे समजते.
बेनॉ हे गेले काही वर्षे त्वचेच्या कर्करोगाने त्रस्त होते. क्रिकेटपटू म्हणून त्यांची कारकीर्द गाजलीच. मात्र त्यापेक्षा समालोचक म्हणून ते सर्वाना जास्त आवडायचे. बेनॉ यांच्या समालोचनाची भुरळ प्रत्येक क्रिकेटप्रेमीला पडली होती. २००० धावा करणारे आणि २०० विकेट अशी दुहेरी कामगिरी करणारे पहिले बेनॉ जगातील पहिले कसोटीपटू होते.
६३ कसोटींमध्ये त्यांनी २२०१ धावा करताना २४८ विकेट घेतल्या. बेनॉ यांच्या कामगिरीची दखल घेत २००९मध्ये आयसीसीने त्यांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला होता. २०१३मध्ये बेनॉ मोठय़ा अपघातातून वाचले होते.
भारताविरुद्ध प्रभावी कामगिरी
लेकब्रेक गुगली गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणा-या बेनॉ यांची भारताविरुद्धची गोलंदाज म्हणून कामगिरी अतिशय प्रभावी होती. त्यांनी भारताविरुद्ध ८ कसोटींत ५२ विकेट घेतल्या आहेत.
१९५६मध्ये भारत दौ-यात त्यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. त्यांनी तीन कसोटींत २३ विकेट घेतल्या होत्या. त्यात मद्रास म्हणजेच आताच्या चेन्नई कसोटीत ७२ धावांत ७ विकेट घेतल्या. ती त्यांची कसोटीमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. बेनॉ यांनी २८ कसोटींत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यातच त्यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने एकही कसोटी मालिका गमावली नव्हती.
#RIPRichie Wonderful personality who was always warm and encouraging. Had great insights on the game (1/3)
— sachin tendulkar (@sachin_rt)
April 10, 2015
fondly remember our discussion on the art of leg spin along with Official @ShaneWarne in Sharjah. Last spoke to him late last year. (2/3)
— sachin tendulkar (@sachin_rt)
April 10, 2015
Was not well but full of enthusiasm. Great loss to the world of cricket. Heartfelt condolences to Richie’s family and friends (3/3)
— sachin tendulkar (@sachin_rt)
April 10, 2015
सचिनने त्याला उत्तम शेवटचा निरोप दिलाय. सचिन माणूस म्हणूनही किती ग्रेट आहे हेच यातून कळते.