लोकसभेत विरोधी पक्षनेते पद देण्याची कॉँग्रेसची मागणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी मंगळवारी फेटाळून लावली.
नवी दिल्ली- लोकसभेत विरोधी पक्षनेते पद देण्याची कॉँग्रेसची मागणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी मंगळवारी फेटाळून लावली आहे.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत महाजन म्हणाल्या की, परंपरा आणि नियमांच्या चौकटीतच आपण निर्णय घेतला आहे. याबाबत आपण महाधिवक्ता मुकूल रोहटगी यांचे मत मागवले होते. मात्र, या पदासाठी आवश्यक असणारे संख्याबळ कॉँग्रेसकडे नसल्याने ते देता येणार नाही.
विरोधी पक्षनेते हवे असल्यास किमान ५५ जागा संबंधित पक्षाला मिळवाव्या लागतात. १९८० आणि १९८४ मध्ये लोकसभेत कोणालाही विरोधी पक्षनेते पद दिले नव्हते, अशी आठवण महाजन यांनी करून दिली.
Pahile virodhi pakshnetychi list pathva