ईएसपीएन-क्रिकइंफोतर्फे दिल्या जाणा-या ‘क्रिकेटर ऑफ द जनरेशन’ पुरस्कारासाठी विक्रमवीर सचिन तेंडुलकरसह सहा क्रिकेटपटूंना नामांकन देण्यात आले आहे.
नवी दिल्ली– ईएसपीएन-क्रिकइंफोतर्फे दिल्या जाणा-या ‘क्रिकेटर ऑफ द जनरेशन’ पुरस्कारासाठी विक्रमवीर सचिन तेंडुलकरसह सहा क्रिकेटपटूंना नामांकन देण्यात आले आहे.
त्यात भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंदर सेहवागसह महान लेगस्पिनर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न, महान फलंदाज वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा, महान ऑफस्पिनर श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन तसेच सर्वोत्कृष्ट अष्टपैलू ज्याक कॅलिस आदी सहा आजी-माजी क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
ईएसपीएन-क्रिकइंफोतर्फे दिल्या जाणा-या वार्षिक पुरस्कारांची संख्या सहा झाली असून त्यात ‘क्रिकेटर ऑफ द जनरेशन’सह क्रिकेटमधील योगदान अशा दोन पुरस्कारांची भर पडली आहे. ‘द वॉल’ राहुल द्रविड ‘क्रिकेटर ऑफ द जनरेशन’ पुरस्कारासाठीच्या विजेत्याची घोषणा करेल.
Sachin Tendulkar Deserves it !
He is not only the Cricketer but more precisely the Player of the Generation !
Am I right ?