पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला आहे.
नवी दिल्ली- पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला आहे. पाकिस्तानने सकाळी ७.३० च्या सुमारास अर्निया सेक्टरमध्ये हा गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.
भारतात घुसणाऱ्या दहशतवाद्यांच्या मदतीकरता पाकिस्तानी रेंजर्स गोळीबार करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारतीय जवानांनीही पाकला चोख प्रत्युत्तर दिले. इस्लामाबादमधील भारताचे डेप्युटी उच्चायुक्त जे.पी. सिंग यांना पाकिस्तानने काल समन्स बजावले. आणि भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.
जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करत गुरूवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाक रेंजर्सनी केलेल्या मॉर्टरच्या हल्ल्यात एक ३५ वर्षीय महिला ठार झाली तर तिचा पती यात जखमी झाला होता. पाक रेंजर्सनी ८२ मिमी आणि १२० मिमीच्या मॉर्टरने भारतीय चौक्यांवर हल्ला केला होता. गेल्या महिन्यात पाकिस्तानने सहा वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.
अरे किती वेळा सांगणार पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले .
कधी तरी बातमी येउदेना कि ‘भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि ५० पाकिस्तानी मारले गेले ‘
नुसता मार खाण्यापेक्षा या घरी निघून …….!!!!!!!!