ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी राणे प्रथमच राजधानीत आले होते.
मुंबई- ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी राणे प्रथमच राजधानीत आले होते. आपल्या पदाचा राजीनामा देताना त्यांनी व्यक्त केलेल्या व्यथा आणि राज्याच्या नेतृत्वाविषयीची नाराजी समजून घेण्यासाठी राहुल गांधी यांनी राणे यांना दिल्लीत पाचारण केले होते. यावेळी झालेल्या संपूर्ण चर्चेदरम्यान गांधी यांनी राणे यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि त्यांच्या भावना पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे तात्काळ पोहोचवणार असल्याचेही सांगितले.
आपले जे काही मुद्दे आहेत ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना सांगितले जातील आणि तोडगा काढला जाईल असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिल्याचेही नारायण राणे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सोमवारी उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नारायण राणे यांची समजूत काढण्याचा काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून नारायण राणे यांना दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी भेटण्यासाठी बोलावले होते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची भेट झाली. ‘‘या भेटीत राहुल गांधी यांनी आपले म्हणणे ऐकून घेतले. ज्या गोष्टींबाबत आपले आक्षेप आहेत असे मुद्दे पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना नक्की सांगू असे आश्वासनही राहुल गांधी यांनी या वेळी दिले.
शिवाय याप्रकरणी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांबरोबरही चर्चा करू असेही राहुल गांधी यांनी सांगितले. मुख्यमंत्री हेही सोनिया गांधी यांची वेळ घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह सोनिया गांधी यांची भेट घेऊ,’’ असेही राणे यांनी या वेळी पत्रकारांना सांगितले.
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी राणे प्रथमच राजधानीत आले होते.
अहो माननीय राणे साहेब , राजकारणात हे राहुल गांधी तुमच्या पेक्षा हुशार आहेत अस आम्हाला वाटत नाही , कोन्ग्रेस च बाळकडू त्यांच्या पेक्षा तुम्हीच जास्त प्यालेले आहात , खरे आहे ना ?????