झारखंडमधील लातेहार येथे नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झालेल्या एका सीआरपीएफ जवानाच्या शरीरात डॉक्टरांना बॉम्ब सापडला आहे.
नवी दिल्ली – झारखंडमधील लातेहार येथे नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झालेल्या एका सीआरपीएफ जवानाच्या शरीरात डॉक्टरांना बॉम्ब सापडला आहे.
रांचीच्या राजेंद्र इन्सिटीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात या जवानाचे शवविच्छेदन सुरु असताना पोटाच्या आतील भागात डॉक्टरांना हा बॉम्ब आढळून आला. यानंतर रुग्णालयात तात्काळ बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आले.
सोमवारी सकाळी लातेहारमध्ये नक्षलवादी आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. यावेळी एक गंभीर जखमी अवस्थेतील जवान नक्षलवाद्यांच्या हाताला लागला. नक्षलवाद्यांनी या जवानाला पेरलेल्या सुरुंगावर झोपवले.
मंगळवारी संध्याकाळी सुरक्षापथके आणि स्थानिक गावकरी बेपत्ता जवानांचा शोध घेत असताना निपचित पडलेला हा जवान त्यांच्या नजरेस पडला. सुरक्षारक्षक आणि गावक-यांनी या जवानाला उचलताच पेरलेल्या सुरुंगाचा मोठा स्फोट झाला. ज्यात तीन गावक-यांचा मृत्यू झाला. लातेहार चकमकीत दहा जवानांचा मृत्यू झाला असून, नऊ जणांचे मृतदेह सापडले आहेत.
दरम्यान या स्फोटात प्राण गमावणा-या गावक-यांच्या कुटूंबियांना सरकारकडून २.३५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
सहनशिलता संपली..आता खरचं पाकिस्तान योग्य धडा शिकवण्याची वेळ आली आहे