उस्मानाबाद – तुळजापुरातील पोलीस आणि महसूल प्रशासनातील वाद आता मारहाणीपर्यंत पोहोचला आहे. तुळजाभवानी मंदिरात बंदोबस्तासाठी असलेल्या रेल्वे पोलिसाला महसूल कमाचा-याने मारहाण केली. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
यात मारहाण करणा-यांमध्ये महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी होते, असा आरोप होत आहे. मात्र, वरिष्ठ पोलिसांच्या दबावामुळे केवळ कर्मचा-यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे बोलले जात आहे.२४ वर्षीय रेल्वे पोलिस कर्मचारी शिवराज गिरी हे घाटशीळ पार्किंग येथे महिला, पुरुष विश्रांती कक्ष आणि अभिषेक पेडपास काऊंटरजवळ भाविकांच्या रांगा लावण्यात व्यस्त होते. त्यावेळी तुळजापूर तहसिल कार्यलयातील दत्तात्रय मेनकुदळेंनी अरेरावी केली आणि गिरी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
मेनकुदळे यांच्यानंतर महसूलच्या वरिष्ठ अधिका-यांनीही गिरी यांना मारहाण केल्याचं बोललं जात आहे. मात्र पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवताना वरिष्ठ महसूल अधिका-यांवर गुन्हा नोंदवला गेला नाही. केवळ कर्मचा-यांवरच गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे पोलिसांमध्ये आता संतापाची भावना आहे. महसूलच्या वरिष्ठ अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस कर्मचा-यांनी लावून धरली आहे. त्यामुळे येत्या काळात पोलीस प्रशासन आणि महसूल विभागातील संघर्ष आणखी वाढणार असल्याचेच चित्र दिसून येते आहे.
कोणीच इमानदार नाहीत बरे कमी झाले तर भस्टचारामुळे हा प्रकार वाढत आहे तर हे असंच होणार आहे खोटं बोलणं हे सरकारी कर्मचारी यांचे कढून शिकावं