कधी आर्थिक परिस्थितीमुळे तर कधी एखादा विषय कठीण जात असल्यामुळे तर कधी अन्य कोणत्या कारणांमुळे मनात असूनही आपण आपलं शिक्षण पूर्ण करू शकत नाही. काही ठरावीक वर्षानंतर आपण तेव्हा शिकलो असतो तर असं वाटायला लागतं. पण तेव्हा नोकरी, धंदा आणि अभ्यासाची सांगड घालणं प्रत्येकालाच जमत असं नाही. पण अशी काही विद्यापीठं किंवा शिक्षण संस्था आहेत ज्यात तुम्ही नोकरी करता करता आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करू शकता. ही विद्यापीठे कोणती याची ही थोडक्यात माहिती.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
ज्यांची वयाची २० वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु ते बारावी पास नाहीत, त्यांना पूर्वतयारी अभ्यासक्रम पूर्ण करून या विद्यापीठातून अभ्यास पूर्ण करता येतो. पूर्ण वेळ द्यावा लागत नसल्याने आपल्या सवडीनुसार घरच्या घरी अभ्यास करून वाणिज्य व आर्ट्स शाखेतील पदवी प्राप्त करता येते. माध्यमिक शिक्षकांसाठी सेवांतर्गत शिक्षण प्रशिक्षण आणि बी.एड्. करण्याची सोय या विद्यापीठाने केलेली आहे. तसेच शैक्षणिक तंत्रज्ञान आणि शैक्षणिक विकास या क्षेत्रात एम.फील.ची सोय करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : रजिस्ट्रार, य. च. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक – ४२२००५
बहि:स्थ अभ्यासक्रम
या अभ्यासक्रमाद्वारे भारतातील ३१ विद्यापीठांमधून टपालाद्वारे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी त्या-त्या विद्यापीठांशी संपर्क साधावा लागतो. मुंबई विद्यापीठात बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी बी.ए. आणि बी. कॉम.चा तीन वर्षाचा अभ्यासक्रम तर पदवीधरांसाठी एक वर्षाचा डिप्लोमा इन फायनान्शिअल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्यासाठी पुढील पत्त्यांवर संपर्क साधता येईल.
>मा. कुलसचिव, पुणे विद्यापीठ, गणेश खिंड, पुणे – ४११००७.
>एस.एन.डी.टी. वीमेन्स युनिव्हर्सिटी, डिपार्टमेंट ऑफ करस्पॉण्डन्स कोर्सेस, जुहू विद्याविहार रोड, सांताक्रूझ (प.), मुंबई – ४०००४९.
>संचालक, डायरेक्टोरेट ऑफ करस्पॉण्डन्स कोर्सेस, युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे, युनिव्हर्सिटी क्लब हाउस, बी. रोड, चर्चगेट, मुंबई – ४०००२०.
>विद्यापीठ उपकेंद्र, द्वारा न्यू आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, अहमदनगर.
>विद्यापीठ उपकेंद्र, द्वारा भाऊसाहेब हिरे वाणिज्य आणि अण्णासाहेब मुरकटे विज्ञान महाविद्यालय, नाशिक.
> विद्यापीठ उपकेंद्र, द्वारा जयहिंद साहित्य विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, धुळे.
इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी
हे विद्यापीठ संपूर्ण भारतभर कार्यरत असून या विद्यापीठातून सर्टिफिकेट, डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर कोर्सेस पूर्ण करता येतात. या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. तसेच विद्यापीठात पूर्ण वेळ हजरही राहावे लागत नाही. आपल्या फावल्या वेळात आपले शिक्षण पूर्ण करता येते. या विद्यापीठात व्यवस्थापन, शिक्षण, समाजशास्त्र, शास्त्र, फाइन आर्ट्स, अभियांत्रिकी, शेतकी आदी ८४ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
संपर्कासाठी-
संचालक, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (अॅडमिनिस्ट्रेशन अँड इव्हॅल्युएशन) के – ७६, होजखान, मैदान गर्टी, नवी दिल्ली – ११००१६.
संकेतस्थळ : www.ignou.ac.in
संचालक, पहिला मजला, एम.एस.एफ. सी. बिल्डिंग, २७०, सेनापती बापट रोड, पुणे – ४११०१६.
संचालक, हेड क्वार्टर्स वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई – ४०० ०२३.
श्रमिक विद्यापीठ, मुंबई
कामगारांसाठी या विद्यापीठात विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कामगारांच्या सोयीच्या वेळेत आणि सोयिस्कर ठिकाणी या विद्यापीठाचे कोर्सेस आयोजित केले जातात. यासाठी पूर्व शिक्षणाची कोणतीही अट नसते. शिक्षणाचे माध्यम मराठी आहे. या विद्यापीठात पुढील कोर्सेस उपलब्ध आहेत.
- वायरमन
- वॉच रिपेअरिंग
- सायकल रिपेअरिंग
- बुक बायडिंग
- स्क्रीन प्रिंटिंग
- भरतनाटय़म्
- नाट्य अभिनय
- टेलरिंग
- वेल्डिंग
- ब्युटिशिअन
- बाहुल्या तयार करणे
- सुतार
- फीटर
- प्रथमोपचार
- फ्रूट प्रिझव्र्हेशन
- बेकरी प्रोडक्टस्
- जॅम आणि सरबत तयार करणे
- बांगकाम
- घरगुती विद्युत आणि आनुषंगिक उपकरणांची देखभाल,
- रेडिओ आणि टेलिव्हिजन दुरुस्ती,
- मोटार वायडिंग
- प्लंबिंग,
- स्टोअर किपिंग
- रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनिंग
- टेपरेकॉर्डर रिपेअरिंग
- स्कूटर रिपेअरिंग
- लघुउद्योग
- फोटोग्राफी
- रबर स्टॅम्प
- राख्या तयार करणे
- साबण तयार करणे
- कपडे धुण्याची पावडर तयार करणे
- खडू तयार करणे
- मेणबत्त्या तयार करणे
- पादत्राणेनिर्मिती.
संपर्कासाठी पत्ता :- श्रमिक विद्यापीठ, समाज शिक्षण मंदिर, आदर्शनगर,
वरळी, मुंबई – ४२२४३३.
संदर्भ : करिअरनामा, दहावी, बारावीनंतर पुढे काय? नोकरी व्यवसाय मार्गदर्शनपर संग्राह्य पुस्तक. संपादक: विजय कोतवाल
sarvapratham apli hi sawnstha khup changle karya rabavat ahe k jya madhyamatun barech jan tyanche ardhavt shikshan purn karu shakent,tyanchya paiki me suddha ek ahe…
Please me school sodun last 10th.year jalet,but mala khup shikshanachi avad hoti kahi karnamule me maje shikshan ardhavtach sodle,so please mala mumbai office che kahi contact details miltil ka ,and tya contact no.call kelyavar concern person kon astil mahiti poorvinare k je mala changle margdarshan karu shaktil….
do the need full…