बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा बहुप्रतिक्षित-बहुचर्चित आगामी हॉलिवूड चित्रपट ‘बेवॉच’चा हिंदी ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला.
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा बहुप्रतिक्षित-बहुचर्चित आगामी हॉलिवूड चित्रपट ‘बेवॉच’चा हिंदी ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. ‘बेवॉच’ या आगामी चित्रपटात प्रियंका एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
‘बेवॉच’चे इंग्रजी चित्रपटाप्रमाणेच हिंदी चित्रपटाचेही ट्रेलर लाँच करण्यात आले आहे. चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मात्र या संपूर्ण ट्रेलरमध्ये प्रियंका फक्त एका दृश्यात अवघ्या एक दोन सेंकदासाठी दिसली आहे. यामुळे तिचे चाहते नाराज झाले आहेत. मुळ चित्रपटात ती बराच वेळ दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांनी नाराज होऊ नये, असे प्रियंकाने म्हटले आहे.
[EPSB]
मला सर्वच क्षेत्रात चमकायचंय : प्रियंका
बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्येही आता स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करू पाहत असलेल्या, प्रियंका चोप्राला कोणत्याही चौकटीत बंधिस्त न राहता एक यशस्वी अभिनेत्री बनण्याची इच्छा आहे.
[/EPSB]
बेवॉच चित्रपटात प्रियंका एका नकारात्मक भूमिकेत आहे. प्रियंका या चित्रपटात हॉलिवूड सुपरस्टार ड्वेन जॉन्सन म्हणजेच WWEचा स्टार खेळाडू द रॉक सोबत काम करणार आहे. हा चित्रपट २६ मे २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे.
एकदम टवटवीत!सुंदर!!