गतविजेता स्पेन असला तरी यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपसाठी ब्राझीलला जेतेपदाचे सर्वाधिक दावेदार मानण्यात येत आहे. फक्त आजी-माजी फुटबॉलपटूच नाही तर ट्विटवरुनही ब्राझीलला सर्वाधिक पसंती दिली जात आहे.
गतविजेता स्पेन असला तरी यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपसाठी ब्राझीलला जेतेपदाचे सर्वाधिक दावेदार मानण्यात येत आहे. फक्त आजी-माजी फुटबॉलपटूच नाही तर ट्विटवरुनही ब्राझीलला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. ब्राझीलचे प्रशिक्षक लुइस फेलिपे स्कोलारी आणि ‘स्टार’ नेयमार ब्राझीलला वर्ल्डकप जिंकून देतील, अशी मते व्यक्त होत आहे.
स्कोलारी यांच्या मार्गदर्शनाखालीच ब्राझीलने २००२मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. ते पाहता त्यांचा अनुभव दांडगा असल्याचे मत व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी ब्राझीलला त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घरच्या मैदानावर कन्फेडरेशन कप जिंकता आला होता. त्या देशातील आर्थिक, राजकीय, सामाजिक वातावरण तणावाचे असतानाही फुटबॉलपटूंच्या मैदानावरील कामगिरीवर कसा परिणाम होऊ द्यायचा नाही, हे धडेही स्कोलारी योग्य तऱ्हेने देतात, याकडे लक्ष वेधून घेण्यात आले आहे.
त्याशिवाय नेयमार हा पेले यांच्या पंक्तीत स्थान मिळवून ब्राझीलला घरच्या मैदानावर वर्ल्डकप जिंकून देईल, असे मत ट्विटरवर फुटबॉलप्रेमींनी मोठया प्रमाणात व्यक्त केले आहे. ब्राझील वर्ल्डकप जिंकतो तेव्हा देशाचा ‘स्टार’ हा फॉरवर्ड फुटबॉलपटूच असतो, असेही आकडेवारी दाखवते. याबाबत ब्राझीलचा माजी वर्ल्डकप विजेता कर्णधार काफूची प्रतिक्रिया बोलकी आहे. ‘‘नेयमार २२ वर्षाचाच असला तरी तो जबाबदारी घेण्यापासून घाबरत नाही,’’ याकडे काफूने लक्ष वेधले. नेयमारने आतापर्यंत ब्राझीलकडून ४८ सामन्यांत ३३ गोल केले आहेत.
At last! Someone with real exieptrse gives us the answer. Thanks!