बॉलिवुड अभिनेता सलमान खानच्या हिट अँण्ड रन खटल्याची इंग्रजीत भाषांतर केलेली कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे पुन्हा एकदा या खटल्याची सुनावणी २० जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
मुंबई – बॉलिवुड अभिनेता सलमान खानच्या हिट अँण्ड रन खटल्याची इंग्रजीत भाषांतर केलेली कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे पुन्हा एकदा या खटल्याची सुनावणी २० जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
सलमानच्या खटल्याची सुनावणी करणा-या मुंबई उच्च न्यायालयाने नोंदणी कार्यालयाला सलमानच्या वकिलांना आवश्यक असलेली कागदपत्रे २० जुलैपर्यंत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले आहेत.
या खटल्याची काही कागदपत्रे मराठी भाषेत आहेत सलमानचे वकील अमित देसाई यांनी ही कागदपत्रे इंग्रजीत उपलब्ध करुन देण्याची विनंती केली होती.
सलमानच्या वकिलांनी या खटल्यातील गहाळ असलेली कागदपत्रे उपब्ध व्हावीत यासाठीही उच्च न्यायालयाकडे अर्ज केला. सुनावणीच्यावेळी गहाळ कागदपत्रे न्यायालयाला नको असतील तर, आपली हरकत नाही मात्र ही कागदपत्रे आवश्यक असतील तर, न्यायालयाने ही कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी निर्देश द्यावेत असे सलमानच्या वकिलांनी अर्जात म्हटले होते.
अमित देसाई यांच्या या अर्जावर न्यायमूर्ती ए.आर.जोशी यांनी सरकारी वकील एस.एस.शिंदे आणि तपास अधिका-यांना पेपर बुकमधील काही कागदपत्रे गहाळ आहेत का ? ते तपासण्याचे निर्देश दिले. आता २० जुलैला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
भारतीय न्यायालये म्हणजे वकील न्यायाधीश यांचे वूपजीविकेचे साधन आहेत काय?